नागपुरातून अपहरण करून वाशिममध्ये गोळ्या झाडून खून; पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा

author img

By

Published : Sep 17, 2021, 7:55 PM IST

Updated : Sep 17, 2021, 8:44 PM IST

गोळ्या झाडून करण्यात आलेल्या हत्याकांडाचा उलगडा

माधव पवार यांचे नागपुरातून अपहरण करण्यात आले होते. त्यांना मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. माधव पवार व आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर येथे बिटकॉईनचा व्यवसाय होता. आर्थिक वादातून हा खून झाल्याचा पोलिसांना संशय आहे.

वाशिम - वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. वाशिम स्थानिक गुन्हे शाखेने तपासाचे चक्रे फिरवीत शुभम कान्हारकर, विकल्प मोहोड, व्यंकटेश भगत या नागपूरमधील आरोपींना अटक केली आहे.

पांघरी कुटे परिसरात 12 सप्टेंबरला बंदुकीच्या गोळ्या झाडून व्यक्तीचा खून करून नग्न अवस्थेत शेतात फेकले होते. हत्येची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी मृत व्यक्तीचे ओळख पटविली. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले. तो मृतदेह नागपूरमधील माधव पवार यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हा खून आर्थिक व्यवहाराच्या वादातून घडल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव करीत आहेत.

नागपुरातून अपहरण करून वाशिममध्ये गोळ्या झाडून खून

हेही वाचा-Anil Deshmukh Case : ईडीने सादर केलेल्या आरोपपत्रात अनिल देशमुखांचे नावच नाही

आर्थिक व्यवहाराच्या वादातून खून झाल्याचा पोलिसांना संशय-
माधव पवार यांचे नागपुरातून अपहरण करण्यात आले होते. त्यांना मालेगाव तालुक्यातील पांघरी कुटे शेतशिवारात नेऊन गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. माधव पवार व आरोपी निशीद वासनिक यांचा नागपूर येथे बिटकॉईनचा व्यवसाय होता. निशीद वासनिकवर नागपूरमध्ये विविध प्रकारचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारात वाद निर्माण झाला होता. मृत माधव पवार यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये सर्व व्यवहाराची माहिती असल्याने त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी दिली.

हेही वाचा-मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात २ कोटी नागरिकांचे लसीकरण!

पोलिसांनी तीन पुरुष आरोपी आणि एक महिला आरोपींना अटक केली आहे. यामध्ये अजून तीन आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेणे सुरू आहे. दरम्यान लवकरच त्यांचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा-गणेश विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

Last Updated :Sep 17, 2021, 8:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.