मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात २ कोटी नागरिकांचे लसीकरण!

author img

By

Published : Sep 17, 2021, 2:18 PM IST

Updated : Sep 17, 2021, 5:18 PM IST

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य!

मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २ कोटींचा टप्पा पार करण्यात आला.

नवी दिल्ली : आज संपूर्ण देश पंतप्रधान मोदींचा 71वा वाढदिवस साजरा करत आहे (PM Narendra Modi 71th Birthday). या निमित्ताने देशात विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवारी दुपारी दीड वाजेपर्यंत देशात कोरोना लसीचे एक कोटी डोस देण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यात आले. तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत २ कोटींचा टप्पा पार करण्यात आला.

मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशात 21 जून रोजी 88.09 लाख आणि 27 ऑगस्ट रोजी 1.03 कोटी विक्रमी लसीकरणाचा पल्ला गाठण्यात आला होता. आता पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त विक्रमी लसीकरणाचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने भारतीय जनता पार्टी 20 दिवसांचा मेगा इव्हेंटही आयोजित करत आहे. या कार्यक्रमाला सेवा आणि समर्पण अभियान असे नाव देण्यात आले आहे. आजपासून सुरू झालेली ही मोहीम 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे.

दुपारी 1:30 पर्यंत 1 कोटीचा आकडा पार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा लसीकरण मोहीम सुरू आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत देशात 1 कोटीहून अधिक लस देण्यात आल्या आहेत. शुक्रवारी एक लाखांहून अधिक ठिकाणी लस दिली जात आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरेही घेण्यात येत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट केले आहे की, चला लस सेवा करूया, ज्यांनी लसीचा डोस घेतला नाही, ते घ्या आणि त्याला मोदींच्या वाढदिवसाची भेट द्या.

  • ‘सबको वैक्सीन, मुफ़्त वैक्सीन’ की PM @NarendraModi जी ने देश को सौग़ात दी है!

    कल हम सबके प्रिय प्रधानमंत्री जी का जन्मदिन है, चलो #VaccineSeva कर जिन्होंने वैक्सीन नहीं ली है, ऐसे अपनों को, परिजनों को और समाज के सभी तबकों को टीका लगवाकर, उनको जन्मदिन का उपहार देते हैं।

    — Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 16, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लसीकरण मोहिमेत राज्यांची स्थिती

लसीकरण मोहिमेत आघाडीची 5 राज्ये

1 उत्तर प्रदेश - 9,08, 08, 863

2 महाराष्ट्र - 7, 08, 15, 786

3 मध्य प्रदेश - 5,40, 73, 805

4 गुजरात - 5, 40, 46, 434

5 राजस्थान - 5, 18, 03, 108

भाजपशासित 5 राज्यांमध्ये लसीकरणाची स्थिती

1 उत्तर प्रदेश - 9,08, 08, 863

2 मध्य प्रदेश - 5,40, 73, 805

3 गुजरात - 5, 40, 46, 434

4 कर्नाटक - 4, 90, 18, 037

5 बिहार - 4, 69, 99, 258

लसीकरण मोहिमेत टॉप 5 बिगर भाजपा शासित राज्ये

1 महाराष्ट्र - 7, 08, 15, 786

2 राजस्थान - 5, 18, 03, 108

3 पश्चिम बंगाल - 4, 89, 80, 159

4 आंध्र प्रदेश - 3, 60, 17, 987

5 केरळ - 3, 29, 74, 236

Last Updated :Sep 17, 2021, 5:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.