ETV Bharat / state

Jewellry businessman killed in Washim: वाशिममध्ये हवेत गोळीबारासह चाकूने वार करून लुटले; सोने व्यापाऱ्याचा मृत्यू

author img

By

Published : Dec 22, 2021, 1:54 AM IST

Updated : Dec 22, 2021, 2:01 AM IST

वाशिममध्ये हवेत गोळीबार
वाशिममध्ये हवेत गोळीबार

मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्सचे सोने व्यापारी दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्या घराजवळ अज्ञात चोरट्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूने वार केले. या घटनेत मंजूर रवी वाळेकर ( Ravi Walekar murder in Washim ) यांचा गोळी लागून मृत्यू ( Jewellry businessman killed in Washim ) झाला आहे.

वाशिम - मालेवगाव येथे सोने व्यापाऱ्यावर चोरट्यांनी हल्ला करून लुटले. या घटनेत एका सोने व्यापाऱ्याचा मृत्यू झाला आहे. रवी वाळेकर ( Ravi Walekar murder in Washim ) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. तर सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे जखमी झाले आहेत.

मालेगाव येथील अंजनकर ज्वेलर्सचे सोने व्यापारी दुकान बंद करून घरी जात होते. त्यांच्या घराजवळ अज्ञात चोरट्यांनी हवेत गोळीबार केला. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूने वार ( goldsmith loot in Washim ) केले. या घटनेत मंजूर रवी वाळेकर यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. सराफा व्यावसायिक योगेश अंजनकर हे गंभीर जखमी झाले आहेत.

चोरांच्या हल्ल्यात सोने व्यापाऱ्याचा मृत्यू

हेही वाचा-Matrimonial Sites Fraud : तब्बल 41 महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणारा 'लखोबा' गजाआड

चोरट्यांची सापडली मोटरसायकल-

चोरट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या सोने व्यापारी रवी वाळेकर यांना वाशिम येथे हलविण्यात येत होते. मात्र त्यांचा रस्त्यात मृत्यू झाला. तर योगेश अंजनकर यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अज्ञात चोरट्यांची मोटरसायकल घटनास्थळी आढळून आली आहे. मालेगाव पोलीस पुढील तपास करीत ( Malegaon Washim Police probe of loot case ) आहेत.

हेही वाचा-Murder In Dhule : घर भाड्याने दिले नाही म्हणून तरुणाच्या पोटात केले धारदार शस्राने वार, जागेवरच पडला रक्ताच्या थारोळ्यात

ब्बल 41 महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणारा 'लखोबा' गजाआड

हल्लीच्या धकाधकीच्या काळात समाजामध्ये वावरण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांना लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक जण मॅट्रिमोनिअल साइट्स ( Matrimonial Sites ) आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेतात. याचाच गैरफायदा घेत तब्बल 41 महिलांची फसवणूक ( Matrimonial Sites Fraud ) करून कोट्यवधी रुपये उकळून काही महिलांचा बलात्कार करणाऱ्यास ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रजित जोगीश केजे ( वय 44 वर्षे, रा. पुदुच्चेरी ), असे लखोबाचे नाव आहे. त्याचा मित्र श्रीनिवासलाही अटक करण्यात आली आहे.

Last Updated :Dec 22, 2021, 2:01 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.