ETV Bharat / city

Matrimonial Sites Fraud : तब्बल 41 महिलांची कोट्यवधींची फसवणूक करणारा 'लखोबा' गजाआड

author img

By

Published : Dec 21, 2021, 5:42 PM IST

Updated : Dec 21, 2021, 7:38 PM IST

हल्लीच्या धकाधकीच्या काळात अनेक जण मॅट्रिमोनिअल साइट्स ( Matrimonial Sites ) आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेतात. याचाच गैरफायदा घेत तब्बल 41 महिलांची फसवणूक करून कोट्यवधी रुपये उकळून काही महिलांचा बलात्कार करणाऱ्यास ( Fraud with women through Matrimonial Sites ) ठाणे पोलिसांनी ( Thane Police ) बेड्या ठोकल्या आहेत. प्रजित जोगीश केजे ( वय 44 वर्षे, रा. पुदुच्चेरी ), असे त्या लखोबाचे नाव आहे. त्याचा मित्र श्रीनिवासलाही अटक करण्यात आली आहे.

आरोपी प्रजित केजे
आरोपी प्रजित केजे

ठाणे - हल्लीच्या धकाधकीच्या काळात समाजामध्ये वावरण्याचे प्रमाण कमी झाल्याने अनेकांना लग्नासाठी आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधणे कठीण झाले आहे. यामुळे अनेक जण मॅट्रिमोनिअल साइट्स ( Matrimonial Sites ) आपल्या आयुष्याच्या जोडीदाराचा शोध घेतात. याचाच गैरफायदा घेत तब्बल 41 महिलांची फसवणूक ( Matrimonial Sites Fraud ) करून कोट्यवधी रुपये उकळून काही महिलांचा बलात्कार करणाऱ्यास ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. प्रजित जोगीश केजे ( वय 44 वर्षे, रा. पुदुच्चेरी ), असे लखोबाचे नाव आहे. त्याचा मित्र श्रीनिवासलाही अटक करण्यात आली आहे.

माहिती देताना पीडित व पोलीस अधिकारी

याबाबत सहायक पोलीस आयुक्त निलेश सोनवणे यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पुण्यात एका महिलेने मॅट्रिमोनिअल साइटवर ओळख झालेल्या व्यक्तीने 17 लाख रुपयांची फसवणूक करुन लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची तक्रार दिली होती. या प्रकरणातील आरोपी ठाणे येथे येणार असल्याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रजित यास 11 डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने आतापर्यंत 41 महिलांची फसवणूक केली असून तब्बल 3 कोटी 28 लाख रुपये लुबाडल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी काही रक्कम तो त्याचा मित्र श्रीनिवास याच्या खात्यावर टाकत होता. यामुळे 19 डिसेंबर रोजी श्रीनिवास यास हैदराबाद येथून अटक करण्यात आली.

असे दाखवत होता आमिष

एखादी विधवा किंवा घटस्फोटीत महिलेला तो लग्नाचे आमिष दाखवत होता. जर अपत्य असेल तर तेही माझी जबाबदारी आहे, असे सांगत होता. मला सावत्र आई होती त्यामुळे मला कधीच प्रेम मिळाले नाही, मी एकटाच आहे, असे भावनिक संभाषण करून तो मुली-महिलांना फसवायचा. भावनेशी खेळत महिलांना जाळ्यात ओढायचा त्यानंतर विविध कारणे सांगत त्यांच्याकडून पैसे उकळायचा व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करायचा.

दुप्पट व्याजाचे आमिष दाखवून अनेकांना लुबाडलं

माझे पॅरिस येथे हॉटेल होते त्याची विक्री झाली असून आरबीआय बँकेच्या खात्यात शंभर कोटी रुपये अडकले आहेत. काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ते पैसे मी काढू शकतो. त्यानंतर दुप्पट व्याज देऊन पैसे करेन, असे म्हणून तो पैसे लुबाडत होता. खरे वाटावे यासाठी हॉटेलमधील काही फोटोही तो दाखवत होता.

पोलिसांनी केले आवाहन

अशा प्रकारे मॅट्रिमोनिअल साइट्सवरुन ज्या महिलांची फसवणूक झाली आहे. त्या महिलांनी पुढे येऊन पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

या गुन्ह्यामध्ये पीडित महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपीपर्यंत गरजेचे होते. अशा वेळी अनेक महिला भीतीपोटी समोर येत नव्हत्या. त्यांना समजावून अशा प्रकारचे गुन्हे रोखण्यासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांनी मेहनत घेऊन या आरोपीला अटक केलेली आहे. या आरोपीकडून आणखी उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

हे ही वाचा - Sushmita Deshmukh Powerlifting : ठाण्यातील सुश्मिता देशमुखची सीनियर पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण भरारी

Last Updated :Dec 21, 2021, 7:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.