ETV Bharat / state

वर्धा : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पालकमंत्र्यांकडून मदतीचे आश्वासन

author img

By

Published : May 15, 2021, 6:23 PM IST

नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहाणी
नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहाणी

दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याच्या पवनार भागात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अतिवृष्टीच्या नियमानुसार हा पाऊस 65 मिलिमीटर पेक्षा कमी असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे.

वर्धा - दोन दिवसांपूर्वी वर्धा जिल्ह्याच्या पवनार भागात वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाला. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. मात्र अतिवृष्टीच्या नियमानुसार हा पाऊस 65 मिलिमीटर पेक्षा कमी असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ केली होती. मात्र शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पवनार येथील शेतकरी सुनील निंबाळकर यांच्या पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. गारपिटीमुळे 12 एकर केळीची बाग मोडली आहे. पपईच्या बागेला देखील पावसाचा फटका बसला आहे. एवढेच नव्हे तर अनेक ठिकाणी घरांची देखील पडझड झाली आहे. आज पालकमंत्री सुनील केदार यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहाणी करून, शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार देखील उपस्थित होत्या.

नुकसानग्रस्त पिकांची पालकमंत्र्यांकडून पाहाणी

महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

यावेळी बोलताना केदार यांनी म्हटले आहे की, पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. जिल्हाधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा अहवाल तयार करण्यास सांगण्यात आले होते. अहवाल तयार झाला आहे. शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत करण्यात येईल, शेतकऱ्यांना या आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. दरम्यान केदार यांच्या या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा - तौक्ते वादळ : समुद्रकिनारी, चौपाट्यांजवळ अग्निशामक दलासह ९३ लाइफगार्ड सज्ज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.