ETV Bharat / state

कॅसिनो विधेयकावरुन रोहित पवारांची बावनकुळे यांच्यावर टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 8, 2023, 10:33 PM IST

Rohit Pawar On Chandrasekhar Bawankule
Rohit Pawar On Chandrasekhar Bawankule

Rohit Pawar On Chandrasekhar Bawankule : हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी महायुती सरकारनं कॅसिनो विधेयक आणल्यानं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना चिमटा काढलाय. यासंदर्भात कायदा करण्यापूर्वी ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

रोहित पवार यांची प्रतिक्रिया

वर्धा Rohit Pawar On Chandrasekhar Bawankule : ‘युवा संघर्ष यात्रा’ वर्धा शहरात आल्यानंतर समीर देशमुख यांनी पुस्तक तुला केली. थोर राष्ट्रपुरुष, संत-महात्मे, महापुरुष, अशा महान व्यक्तींच्या पुस्तकांचा यामध्ये समावेश असून ही प्रेरणादायी पुस्तकं युवा संघर्ष यात्रेतील सहभागी संघर्ष यात्रींना देण्यात आली, अशी महिती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे. विदर्भातील अनेक समस्या आहेत. शेतकरी अडचणीत आहे. विदर्भातील अनेक नेते मंत्रिपदावर विराजमान आहेत. तसंच उपमुख्यमंत्रीही विदर्भातीलच, तरी देखील विदर्भात शेतकरी संकटात आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार अशा अनेक समस्या राज्यात आहेत.

काय म्हणाले रोहित पवार? : शेतकरी आत्महत्या, शेतीचे नुकसान, अमली पदार्थांच्या आहारी गेलेले तरुण, आरोग्य विभागाची कोंडी अशा अनेक गंभीर समस्या असताना पहिल्याच दिवशी सरकारनं कॅसिनोच्या मुद्द्यावर निर्णय घेतला. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना चिमटा काढलाय. कॅसिनोच्या महत्त्वाच्या प्रश्नावर बावनकुळेंच्या अध्यक्षाची समीती नियुक्ती करून त्यांच्याकडे विधेयक पाठवा, अशी पोस्ट रोहित पवार यांनी केली आहे.

कॅसिनो विधेयक आणलं : दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी बावनकुळेंचा कॅसिनोमधील फोटो शेअर करून त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना बावनकुळे यांनी एका रात्रीत साडेतीन कोटी रुपये कॅसिनोमध्ये खर्च केल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला होता. ट्विटमध्ये राऊत यांनी दावा केला की, महाराष्ट्र पेटलेला असताना मकाऊ येथील कॅसिनोमध्ये बावनकुळे जुगार खेळत होते. मात्र राऊतांचे आरोप बावनकुळे यांनी फेटाळून लावले होते. त्यामुळे बावनकुळे यांची चांगलीच चर्चा झाली होती. अशातच सरकारनं पहिल्याच दिवशी कॅसिनोच्या विषयावर विधेयक आणलं. त्यामुळं विरोधकांना टीका सरकारवर टीका करण्याची संधीच मिळाली.

हेही वाचा -

  1. पोलिसांनी केली नाना पटोलेंची उचलबांगडी, विविध प्रश्नावर युवक काँग्रेस आक्रमक
  2. राज्यात लवकरच 'स्मार्ट मीटर' बसवणार - देवेंद्र फडणवीस
  3. इथेनॉल बंदी, कांदा निर्यात बंदीच्या मुद्द्यावर सोमवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीवारी?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.