ETV Bharat / state

कुत्र्याला दगड मारल्याने वर्ध्यात एकाची निर्घृण हत्या, आरोपीला अटक

author img

By

Published : Aug 21, 2020, 5:10 PM IST

Man murdered at Wardha for petty reasons
शुल्लक कारणातून वर्ध्यात एकाची हत्या

वर्ध्याच्या बरबडी रोडवरील एफसीआय गोडाऊन परिसरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी असलेल्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली. गुरुवारी क्षुल्लक कारणामुळे या दोन्ही कुटुंबात बाद झाला होता.

वर्धा - वर्ध्याच्या बरबडी रोडवरील एफसीआय गोडाऊन परिसरात एकाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबाशी असलेल्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली. गुरुवारी क्षुल्लक कारणामुळे या दोन्ही कुटुंबात बाद झाला होता. प्रवीण मोहन कांबळे (30) असे व्यक्तीचे नाव असून या प्रकरणी तिघांना सेवाग्राम पोलिसांनी अटक केली आहे.

सेवाग्राम पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टीत दीपक वैरागडे आणि रायकर हे कुटुंब राहत आहे. येथे मृत प्रवीण हा सुद्धा झोपडी बांधून राहायला आला. तेव्हापासून थोड्या थोड्या कारणांमुळे त्यांच्यात वाद होत होता. गुरुवारी दुपारी प्रवीण आणि रायकवार यांच्यासोबत कुत्र्याला दगड मारल्याचा कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद तेव्हा कसाबसा थांबला. त्यावेळी अनिता रायकवार (40) दीपक वैरागडे (37) योगराज रायकवार (20) यांनी प्रवीणला जीवे मारण्याची धमकी दिली.

हेही वाचा - सुशांत मृत्यू प्रकरण: रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांच्यातील व्हॉट्सअ‌ॅप चॅट झाले व्हायरल

सायंकाळी अनिता रायकवार हिच्याशी प्रवीण कांबळेचे भांडण झाले. यावेळी अनिताने त्याला मारहाण केली. एवढ्यात दीपक वैरागडे, आणि योगीराज हा धावत आला. त्यांनी त्याला काठीने मारहाण करत त्याच्या पोटात चाकू भोसकून हत्या केली. जास्त रक्तस्त्राव आणि गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला. यावेळी उपविभागीय अधिकारी पियुष जगताप आणि पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीची शोध मोहीम सुरू केली. पोलिसांनी तिघांना अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.