ETV Bharat / state

सरकारने आमच्याकडेही लक्ष देऊन सन्मानजनक मानधन द्यावा, आशा गटप्रवर्तकांचे आंदोलन

author img

By

Published : May 24, 2021, 10:20 PM IST

Updated : May 24, 2021, 10:35 PM IST

आंदोलक
आंदोलक

विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सीटूच्या वतीने विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय काम बंद धरणे आंदोलन करण्यात आले.

वर्धा - राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा कर्मचारी, गटप्रवर्तक मागील 12 वर्षांपासून आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना काळात घरोघरी जाऊन महत्त्वाची भूमिका पार पाडल्यात. पण, सरकार येकडे लक्ष देऊन सन्मानजनक मानधन देत नसल्याने सिटूच्या नेतृत्वात एक दिवस काम बंद ठेवून लक्ष वेधले. वर्ध्यात सिटू कार्यलयापुढे धरणे दिले.

बोलताना जिल्हा सचिव, आशा गट प्रवर्तिका

महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक फेडरेशन सीटूच्या आव्हानानुसार आशा-गटप्रर्वतकांच्या प्रलंबित मागण्या आणि सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने त्यांच्या कामात होत असलेल्या अडचणींकडे राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी देशभर आंदोलन केरण्यात आले. जिल्हा आशा गटप्रर्वतक कर्मचारी युनियनच्या वतीने जिल्ह्यात तसेच सीटू संघटनेच्या कार्यालयापुढे सीटूचे राज्य उपाध्यक्ष यशवंत झाडे, जिल्हा सचिव भैय्याजी देशकर, आशा गटप्रर्वतक संघटेनच्या जिल्हा सचिव अर्चना घुगरे, अध्यक्ष अलका जराते, कार्याध्यक्षा मिनाक्षी गायकवाड, सुषमा गुरुनुले, वैशाली टिपले यांच्या नेतृत्वात सहभाग नोंदविला.

  • या आहेत मागण्या
  1. कोरोना काळात कामाचा मोबदला म्हणून 300 रुपये रोज भत्ता द्यावा
  2. कर्मचाऱ्यांना शासकीय दर्जा द्यावा
  3. सुरक्षा साधने पुरवावित
  4. आरोग्य खात्यातील रिक्त असलेल्या जागा आशा–गटप्रर्वतकांमधूनच भरण्यात याव्या
  5. 45 व्या श्रम आयोगाच्या शिफारशीनुसार आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन लागु करण्यात यावे
  6. आशा व गटप्रवर्तक यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता मागील फरकासह एप्रिल 2020 पासून देण्यात यावा

तालुका पातळीवर आशा गटप्रर्वतकांनी संपात सहभागी होऊन कोरोना व निर्बंधातील नियम पाळून तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य अधिकारी, यांना निवेदन दिले.

हेही वाचा - पेट्रोल शंभरी पार, वर्ध्यात वाढल्या दुचाकीतून पेट्रोल चोरीच्या घटना!

Last Updated :May 24, 2021, 10:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.