ETV Bharat / state

two college girls same sex marriage : 26 वर्षीय तरुणी 27 वर्षीय मैत्रिणीसोबत बेपत्ता; समलैगिंक विवाह केल्याचा संशय !

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 8, 2023, 10:59 PM IST

Updated : Sep 8, 2023, 11:05 PM IST

two college girls same sex marriage : 26 वर्षीय तरुणी 27 वर्षीय मैत्रिणीसोबत बेपत्ता झाल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे मुलगी तिच्या 27 वर्षीय मैत्रिणी सोबत असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय. शिवाय दोघीमध्ये समलैगिंक संबंध असल्यानं त्यांनी विवाह केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

Same Sex Marriage
Same Sex Marriage

ठाणे Same Sex Marriage : 26 वर्षीय मुलीच्या वडिलांनी मानपाडा पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. विशेष म्हणजे ही तरुणी तिच्या 27 वर्षीय मैत्रिणीसोबत असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. शिवाय दोघींचे समलैंगिक संबंध असल्यानं त्यांनी लग्न केल्याचा संशय आहे.

मैत्रिणीसोबत मुलगी बेपत्ता : मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता मुलीचे वडील हे कल्याण शीळ रोडवरील एका गावात कुटुंबासह राहतात. त्यांच्या बेपत्ता झालेल्या मुलीनं पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. याशिवाय डोंबिवलीत राहणारी तिची 27 वर्षीय मैत्रिण गेल्या काही महिन्यांपासून पिसवली येथील तिच्या घरी येत होती. दोघींची घट्ट मैत्री असल्यानं तक्रारदाराच्या वडिलांनी तिच्या कुटुंबातील समस्या सांगून त्यांचा विश्वास संपादन केल्याचं फिर्यादीच्या वडिलांनी म्हटलं आहे.

मुलगी हरवल्याची तक्रार : बेपत्ता मलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीची मैत्रीण आमच्या घरी यायची, तासनतास ती आमच्याच घरी राहायची. माझ्या मुलीनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळं आम्ही तिच्या लग्नाची तयारी करत होतो. तसंच तिच्यासाठी मुलगा शोधत होतो. मात्र, अचानक दोन महिन्यांपूर्वी माझी मुलगी काहीही न बोलता घरातून निघून गेली. तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. त्यामुळं मी 4 जुलै 2023 रोजी मानपाडा पोलिस स्टेशनमध्ये 26 वर्षीय मुलगी हरवल्याची तक्रार केल्याचं तिच्या वडीलांनी सांगितलं.

दोन-तीन दिवसांत खर कारण समोर येईल : गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता मुलीचा शोध पोलिसांना लावता न आल्यानं फिर्यादीच्या वडिलांनी 2 सप्टेंबर रोजी पुन्हा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्या अर्जात त्यांनी सर्व घटनांचा उल्लेख केलाय. दुसरीकडे, डोंबिवली विभागाचे एसीपी सुनील कुराडे यांच्याशी संपर्क साधला असता, मुलगी बेपत्ता होण्याचे खरे कारण दोन-तीन दिवसांत समोर येइल असं त्यांनी सांगितलं. तसंच मुलीबाबत तिला शोध घेऊन पोलिस ठाण्यात आणल्यानंतर अधिक यावर बोलता येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मैत्रिणीवर गंभीर आरोप : या प्रकरणी बेपत्ता मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीवर गंभीर आरोप केले आहेत. माझी मुलगी अडचणीत आहे. तिचं पळवून नेलेली मैत्रीण मानसिक छळ करत असल्याचा आरोप बेपत्ता वडीलांच्या मुलीनं केलाय. माझ्या मुलीच्या जीवाला धोका असून पोलिसांनी लवकरात लवकर माझ्या मुलीचा शोध घ्यावा अशी विनंती त्यांनी केली आहे.

हेही वाचा -

  1. Boat Capsizing In Indravati River: बोट उलटल्यानं सात जणांना जलसमाधी, कुठं घडली घटना?
  2. Mumbai Blast Case : मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात अखेर विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती, उच्च न्यायालयानं खडसावल्यानंतर सरकारला जाग
  3. Bhivandi Crime News : विवाहितेचा गर्भपात करून विष देऊन ठार मारण्याचा प्रयत्न; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल
Last Updated :Sep 8, 2023, 11:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.