ETV Bharat / state

The in laws killed woman : गोळीबार करून सासरच्या मंडळीनी केली विवाहितेची हत्या; पतीसह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 20, 2023, 5:31 PM IST

The in laws killed woman : गोळीबार करून सासरच्या मंडळीनी विवाहितेची हत्या केल्याचा आरोप झाला आहे. काल संध्याकाळी ठाणे जिल्ह्यात हे प्रकरण घडलं. या प्रकरणी आज पतीसह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The in laws killed woman
The in laws killed woman

ठाणे The in laws killed woman : पतीसह सासरच्या मंडळीनी विवाहितेचा छळ करून तिच्यावर बंदुकीतून गोळीबार करत तिला ठार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील मृतक सासरी राहत असलेल्या घरात घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. रंजना शिवा भवर (वय २७) असे गोळीबारात ठार झालेल्या विवाहितेचं नाव आहे. तर पती शिवा भवर, सासू सावित्री भवर, सासरे काळू भवर, गजमल भवर, आत्या भवर, बेंडू भवर अशी गुन्हा दाखल झालेल्या सासरच्या सहा जणांची नावे आहेत.


मारहाण आणि शिवीगाळ - मिळालेल्या माहितीनुसार मृतक रंजना शहापूर तालुक्यातील नांदगाव चिंचपाडा येथे राहणारी होती. तिचा विवाह शहापूर तालुक्यातील अजनुप ग्रामपंचायत हद्दीतील बोंडरपाडा येथील शिवा भवर याच्याशी २८ एप्रिल २०१८ रोजी झाला. त्यानंतर वर्षभर सुखाचा संसार सुरू असतानाच आरोपी पती हा मृतक पत्नीला घर खर्चासाठी पैसे माहेरुन घेऊन ये असा असा तगादा लावत तिला मारहाण आणि शिवीगाळ करत होता. त्यातच विवाह झाल्यानंतर दोघांना दोन मुले झाली असून एक मुलगी साडेतीन वर्षाची आहे. तर मुलगा दीडवर्षाचा आहे. अशातच सासरची मंडळी अधिक छळ करीत असल्याने मृतक रंजनाने २०२२ मध्ये विष घेतलं होतं. मात्र त्यावेळी तिच्यावर तातडीनं उपचार केल्याने ती बरी झाली होती. त्यानंतर दोन मुलांना घेऊन ती माहेरी राहात होती. त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिला पुन्हा समजूत काढून सासरी आणले होते.

गोळ्या घालून रंजनाची हत्या - मात्र काही दिवसात पुन्हा सासरच्या मंडळीकडून विविध घरगुती कारणावरून नाहक छळ केला जात होता. त्यामुळे माहेरी फोन करून आई वडील अथवा भावाला सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाची माहिती मृतक देत होती. यामुळे सासरच्या मंडळींचा मृतक रंजनाशी १९ सप्टेंबर रोजी रात्रीच्या साडे नऊ वाजल्याच्या सुमारास वाद होऊन सासरच्या मंडळींनी छऱ्याच्या बंदुकीने गोळ्या घालून रंजनाची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलीस ठाण्याअंर्तगत येणाऱ्या खर्डी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर घटनास्थळी पंचनामा करत रंजनाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयातून आज सकाळी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

गुन्हा दाखल - मृतकाचा भाऊ पांढरी नवसू केवारी (वय ३०) याच्या तक्रारीवरून तिच्या पतीसह सासरच्या सहा जणांच्या विरोधात (आज) २० सप्टेंबर रोजी शहापूर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२, ४९८(अ ) ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत पराड करीत असल्याची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे.

  1. Thane Husband Wife Viral Video : भर रस्त्यात नवरा बायकोची हाणामारी, व्हिडिओ व्हायरल
  2. Thane Murder News : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या; प्रियकर फरार
  3. Sex With Dog : कुत्र्यासोबत अनैसर्गिक सेक्स करताना पकडलं, गुन्हा दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.