ठाणे Sex With Dog : कुत्रा, मांजर अशा पाळीव प्राण्यांवर लोकं जिवापाड प्रेम करतात. त्यांच्यावर झालेला अत्याचार अनेकांना डोळ्यांनी बघवत नाही. एखाद्या कुत्र्याला किंवा मांजरीला काही इजा झाली तर अनेकजण त्याला वाचवण्यासाठी धावाधाव करतात. परंतु आपल्या समाजात असे काही नराधम देखील आहेत, ज्यांची मानसिकता अत्यंत विकृत आहे. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना ठाणे जिल्ह्यातील मुंब्रामध्ये उघडकीस आली.
कुत्र्यावर अनेसर्गिक अत्याचार : मुंब्रा येथं एका नराधमानं निष्पाप भटक्या कुत्र्यावर अनेसर्गिक अत्याचार केला. एका सजग नागरिकानं या घटनेचा व्हिडिओ बनवला व तो मुक्या प्राण्यांसाठी काम करणाऱ्या 'पीपल फॉर अॅनिमल्स' या संघटनेचे अध्यक्ष विजय रंगारे यांच्याकडे पाठवला. त्यांनी याची दखल घेत, या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आता पोलीस या विकृत व्यक्तीचा शोध घेत आहेत.
तक्रार नोंदवून तपास सुरू केला : मुंब्रा येथील आझाद नगर भागात १० सप्टेंबर रोजी ही घटना घडली. ही घटना अत्यंत विकृत आणि अमानवीय असल्यानं 'पीपल फॉर अॅनिमल्स' या संघटनेचे अध्यक्ष विजय रंगारी यांनी याबाबत तातडीनं मुंब्रा पोलिसांत तक्रार नोंदवली. मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणी भादंवी ३७७ आणि ११ (१) प्राण्यांबरोबर कृत्य रोखण्यासाठीच्या कायद्यान्वये तक्रार नोंदवून तपास सुरू केला.
घटनेनंतर आरोपी फरार झाला : या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध होवून त्याची तक्रार नोंदवेपर्यंत बराच वेळ गेला. तोपर्यंत हा आरोपी फरार झाला. आता मुंब्रा पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याची मागणी प्राणी-मित्र संगठनांनी केलीय. व्हिडिओतील या आरोपीचं नाव 'करीम' असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. मात्र तो कुठे राहतो हे कोणालाच माहित नाही. तो या भागामध्ये नेहमीच फिरत असल्याचं लोकांनी सांगितलंय. मुंब्रा पोलिसांनी या आरोपीचं छायाचित्र सर्वत्र प्रसिद्ध केलं असून, तो कोणालाही आढळल्यास तातडीनं पोलिसांना कळविण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय.
हेही वाचा :