ETV Bharat / state

Demanding Ransom From a Railway Contractor : रेल्वे ठेकेदारांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या खंडणीबहाद्दरासह साथीदार अटकेत

author img

By

Published : Mar 6, 2022, 10:26 PM IST

आरोपी
आरोपी

एका रेल्वे ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी उकळण्यासाठी ( Demanding Ransom From a Railway Contractor ) साईटवरील कामगारांना रेल्वेच्या वसाहतीतील एका पडीक खोलीत डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील आनंदनगर भागातील रेल्वे वसाहतीत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य एकाला अटक केली ( Police Arrested Two Accused ) असून अन्य दोघांचा शोध सुरू आहे. अटकेतील दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे - एका रेल्वे ठेकेदाराकडून १० लाखांची खंडणी उकळण्यासाठी ( Demanding Ransom From a Railway Contractor ) साईटवरील कामगारांना रेल्वेच्या वसाहतीतील एका पडीक खोलीत डांबून ठेवत बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील आनंदनगर भागातील रेल्वे वसाहतीत घडली आहे.

व्हायरल व्हिडिओ

याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात रेल्वे ठेकेदार एस.बी. खकाळा यांनी खंडणी मागणाऱ्या आरोपीविरोधात दिलेल्या कलमान्वये भा.दं.वी.चे कलम 364 (अ), 384, 385, 294, 324, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून खंडणी बहाद्दरासह त्याच्या साथीदाराला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली ( Police Arrested Two Accused ) आहे. विजय कदम आणि एस. जगताप, असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

काही दिवसापूर्वीच गुंडाला दिले पाच हजार रुपये - ठाण्यातील नौपाड्यात राहणाऱ्या एस.बी. खकाळा या कंपनीच्या माध्यमातून कल्याण पूर्वकडील रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे कॉन्ट्रक्ट घेतले आहे. रेल्वे यार्ड संरक्षण भिंतीच्या बांधकामाचे काम सुरू केल्यानंतर त्याच भागात राहणारा गुंड विजय कदम याने साईटवर येऊन पैशांची मागणी केली होती. यामुळे काम बंद होऊन नुकसान होऊ नये म्हणून साईटवरील मॅनेजरने विजय कदम याला त्याच्या मागणीनुसार काही दिवसांपूर्वी पाच हजार रुपये दिले होते.

धमकीचा व्हिडिओ व्हायरल - घाबरुन ठेकेदाराने पाच हजार दिल्यानंतर अधिक खंडणीच्या मागणीसाठी गुंड विजय हा साईटवर येऊन मॅनेजर व कामगारांना धमकी देत होता. त्यावेळी एका कामगाराने त्याचा मोबाईल कॅमेऱ्यात गुपचूप आरोपीच्या धमकीचे चित्रीकरण केले. त्यामध्ये गुंड बोलतो की, तुमच्या साईटवरील डंपर आणि इतर साहित्य जाळायला मला केवळ पाचशे रुपये खर्च होईल. मात्र, तुमच्या मालकाचे किती नुकसान होईल ये त्याला सांगा, असे बोलतानाचे चित्रीकरण करून ते व्हायरल केले.

खंडणीसाठी कामगारांला ठार मारण्याची धमकी - गुंड विजय हा धमकावून अधिक पैशाची मागणी करत होता. पण, ठेकेदाराने प्रतिसाद न दिल्याने ४ मार्चला गुंड विजय कदम व त्याच्या तीन साथीदारांनी खंडणी वसूल करण्यासाठी कल्याणच्या रेल्वे यार्ड साईटवर काम करत असलेल्या कामगारांना आनंदवाडी भागातील रेल्वेच्या पडीक कॉटर्समध्ये डांबून ठेवून बेदम मारहाण करत ठेकेदाराला फोन करुन १० दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली. शिवाय रक्कम न दिल्यास कामगारांना ठार मारण्याची धमकी ठेकेदाराला मुख्य आरोपीने दिली होती, असे तक्रारीत म्हटले आहे.

चार दिवस पोलीस कोठडी - गुन्हेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन रविवारी (दि. सहा मार्च) पहाटेच्या सुमारास मुख्य आरोपीसह एकाला अटक केली ( Police Arrested Two Accused ) आहे. अटक आरोपींना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता दोघांना अधिक चौकशीसाठी चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक एम.डी. डोके करत आहेत.

हेही वाचा - Ulhasnagar Minor Girl Rape : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार; आरोपी अटकेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.