ETV Bharat / state

Ulhasnagar Minor Girl Rape : धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार; आरोपी अटकेत

author img

By

Published : Mar 4, 2022, 11:03 PM IST

रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ( Ulhasnagar Minor Girl Rape ) आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला ( Auto Driver Rape Case ) आहे.

Auto Driver Rape Case
Auto Driver Rape Case

ठाणे : उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 35 वर्षीय रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला ( Ulhasnagar Minor Girl Rape ) आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात अत्याचारासह पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला अटक केली ( Auto Driver Rape Case ) आहे. दीपक हिवाळे, असे अटक आरोपीचे नाव आहे.

२४ तासांत आरोपीला बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी दीपक हिवाळे यांने पीडित मुलीशी 6 महिन्यांपूर्वी ओळख वाढवली होती. त्यानंतर तिच्या बालमनाचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. ही बाब पीडित मुलीच्या आई-वडिलांना काल ( गुरुवारी) मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

त्यानंतर तत्काळ मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दीपक हिवाळे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून विठ्ठलवाडी पोलिसांनीही २४ तासांच्या आत आरोपीला बेड्या ठोकल्या. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - Vijay Wadettiwar Reaction : ओबीसी आरक्षण लागू न होणे ही माझी वैयक्तिक जबाबदारी नाही - मंत्री विजय वडेट्टीवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.