ETV Bharat / state

विद्यार्थ्यांनो लागा तयारीला, उद्यापासून शाळांची घंटा वाजणार; सर्वत्र स्वच्छतेची लगबग

author img

By

Published : Oct 3, 2021, 7:51 AM IST

'शाळा सुटली पाटी फुटली' हे वाक्य आता पुन्हा ऐकायला मिळणार आहे. कारण, गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळांची घंटा उद्यापासून वाजणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक शाळात कोरोनाच्या नियमांच्या निकषानुसार साफसफाई आणि स्वच्छता सुरू झाली आहे.

दीड वर्षांपासून शाळा बंद
दीड वर्षांपासून शाळा बंद

ठाणे : 'शाळा सुटली पाटी फुटली' हे वाक्य नेहमी ऐकायला मिळायचे. पण गेल्या दीड वर्षांपासून शाळाच बंद आहेत, तर हे वाक्य कुठून ऐकायला मिळणार? कोरोनामुळे विदयार्थ्यांची शाळा सुटली ती तब्बल दीड वर्षासाठी. विद्यार्थी शाळेला खूप मिस करत होते. परंतु आता पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. उद्यापासून (4 ऑक्टोबर) आठवी ते दहावीची शाळा सुरू होणार आहे. पुढील काही दिवसात इतर इयत्तांची शाळा देखील सुरू होणार आहे. ४ ऑक्टोबरला पुन्हा ठाण्यात शाळा सुरु होणार आहेत. यासाठी आता सर्व शाळांमध्ये साफसफाई जोराने सुरु झाली आहे.

उद्यापासून शाळेची घंटा वाजणार

दीड वर्षांपासून विद्यार्थी करतात शाळेला मिस

ठाणे व मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाने हाहाकार माजवला. सर्वांचे जीवन विस्कळीत झाले. त्याचा परिणाम सर्वच स्तरावर पडला. तर सर्वात मोठा परिणाम विदार्थांवर पडला. त्यांच्या शाळा व कॉलेज बंद झाले. ऑनलाईन अभ्यास सुरु झाला. त्यामुळे ज्या गोष्टींपासून मुलांना लांब ठेवायचा विचार असायचा; म्हणजेच मोबाईल व कॉम्प्युटर अशा वस्तू. परंतु याच वस्तूंशी या चिमुकल्यांना दोस्ती करावी लागली. पालकांनाही स्वःताच्या हाताने मोबाईल आपल्या मुलाला द्यावे लागले. कारण, कोरोनामुळे अनेक वर्गांचे ऑनलाईन क्लास सुरू झाले. यामुळे मुलांचे विश्वच ऑनलाईन झाले. परिणामी प्रत्येक विद्यार्थी शाळेला मिस करत होता. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत.

पुन्हा घंटा वाजणार, शाळांची तयारीची लगबग

आता पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे. ४ ऑक्टोबरला पुन्हा ठाण्यात शाळा सुरु होणार आहेत. यासाठी आता सर्व शाळांमध्ये साफसफाई जोराने सुरु झालीय. शाळा सॅनेटराईज करणे, शाळेची साफसफाई करणे, बँच साफ करणे, मुलांना सोशल डिस्टन्स ठेवून बसवणे, त्याची तयारी करणे, जागो जागी सॅनेटराईजच्या बॉटल ठेवणे, अशी जोरदार तयारी ठाण्यातील शाळेत सुरु झाली. ठाण्यातील श्रीरंग विद्यालयात अशीच तयारी दिसली.

हेही वाचा - राज्यात शनिवारी 2 हजार 696 नवे रुग्ण, तर 49 रुग्णांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.