ETV Bharat / state

'एनआयए' पथकाने रेतीबंदरवर सचिन वाझेसह घेतला आढावा

author img

By

Published : Mar 26, 2021, 2:14 AM IST

ठाणे
ठाणे

हिरेन यांची हत्या क्लोरोफॉर्मने झाल्याचे स्पष्ट झाले असले तरीही मनसुख हिरेंनच्या हत्येनंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला होता. इथेपर्यंत तपास यंत्रणा पोहचली असतानाच मृतदेह कुठे फेकला? याची चौकशी करण्यासाठी गुरुवारी रात्री एनआयएच्या पथकाने सचिन वाझेसह रेतीबंदरवर तपासणी केली.

ठाणे - मुकेश अंबानी यांच्या घराजवळील स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) तत्परतेने चौकशी करीत आहे. याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या मनसुख हिरेन हत्येचा तपासही एनआयए जलदगतीने करीत आहे. हिरेन यांची हत्या क्लोरोफॉर्मने झाल्याचे स्पष्ट झाले असले तरीही मनसुख हिरेंनच्या हत्येनंतर मृतदेह रेतीबंदर खाडीत टाकला होता. इथेपर्यंत तपास यंत्रणा पोहचली असतानाच मृतदेह कुठे फेकला? याची चौकशी करण्यासाठी गुरुवारी रात्री एनआयएच्या पथकाने सचिन वाझेसह रेतीबंदरवर तपासणी केली.

ठाणे

दरम्यान, एनआयए पथकाला हत्या कशी झाली? याचा वृत्तांत समजला. मात्र, मृतदेह मुंब्रा रेतीबंदरवर फेकला की अन्य ठिकाणी याची चाचपणी तपस यंत्रणा करीत आहे. एनआयए पथक सचिन वाझे यांना घेऊन गणेश घाटावर आली. घाटाची पाहणी केल्यानंतर ४०० मीटरवर मनसुख याचा मृतदेह सापडला त्या ठिकाणीही एनआयएचे पथक थांबले. वाझे यांना प्रश्न विचारले त्यानंतर एनआयएचे पथक गायमुख येथे सचिन वाझे यांच्यासह पोहचली. दरम्यान, मनसुख हिरेन यांच्या हत्येत विनायक शिंदे सचिन वाझे यांच्या व्यतिरिक्त अन्य आरोपींचा सहभाग असल्याचा दाट संशय एनआयएला आहे. त्या दिशेनेच एनआयएचे पथक तपास करीत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.