ETV Bharat / state

Firing Incident In Telangana: 'त्या' गुन्हेगारांच्या पार्टीतील गोळीबाराची घटना बदलापुरात नव्हे, तर तेलंगाणा राज्यात घडल्याचे उघड

author img

By

Published : Jul 28, 2023, 9:16 PM IST

Firing Incident In Telangana
अटकेतील गुन्हेगार

बदलापूर शहरातील पनवेल हायवे लगतच्या माळरानात गुन्हेगारांच्या दारू पार्टीत एक गुन्हेगार गंभीर जखमी झाला होता. ही गोळीबाराची घटना बदलापुरात नव्हे तर तेलंगाणा राज्यातील डोंगराळ परिसरात घडल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. यातील तक्रारदार गुन्हेगारांनी मिळून तेलंगाणा राज्यातील घटनेचा बदलापुरात गोळीबार केल्याचा धक्कादायक बनाव रचला. ७ दिवसांच्या पोलीस तपासानंतर याचा उलगडा झाला.

गुन्हेगारांनी रचलेल्या फायरिंग घटनेच्या बनावाविषयी पोलीस उप आयुक्तांची प्रतिक्रिया

ठाणे : गोळीबार प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात खोटी फिर्याद देणाऱ्या जखमी गुन्हेगारासह त्याच्या तीन साथीदारांवर गुन्हा दाखल करत दोन गुन्हेगारांना अटक केली आहे. यापैकी एक गुन्हेगार फरार झाला आहे. राम आशिष राजेंद्र पटेल (वय 32), रेहान अब्दुल युसूफ खान (वय 36 ) असे अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत तर फिर्यादी सुनील बिपई प्रसाद प्रजापती (वय 24) हा पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक गुन्हेगार फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे.


खोटी तक्रार देण्यासाठी 'असा' रचला बनाव : जखमी गुन्हेगार सुनील हा उल्हासनगरमधील राहणारा आहे. २१ जुलै रोजी रात्री १० वाजल्याच्या सुमारास बदलापूर पूर्व येथील पनवेल हायवे जवळ काही जण दारू पीत बसले होते. येथे दोन अनोळखी इसमांमधील भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यातील एकाने फिर्यादी गुन्हेगार सुनीलला शिवीगाळ करून त्याच्यावर गोळीबार केला. घटनेची माहिती बदलापूर पूर्व पोलीस पथकाला दिली गेली. त्याच्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात २३ जुलै रोजी गोळीबार करणाऱ्या दोन अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.


तेलंगाणामधील पार्टीत गोळीबार : गुन्ह्याचे गांभीर्य पाहून बदलापूर पूर्व पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने समांतर तपास सुरू केला. या पोलीस पथकाने तांत्रिक माहितीच्या आधारे व गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढली. गुन्हा घडला त्यावेळी प्रत्यक्ष हजर असणारा जहीर नजीर अन्सारी याला शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. पोलीस पथकाने जहीरकडे चौकशी केली असता, त्याने पार्टीतील गोळीबाराची खळबळजनक माहिती दिली. जखमी सुनील हा त्याचे साथीदार रेहान खान, राम पटेल असे तिघे वेगवेगळ्या ट्रेनने तेलंगणा राज्यातील नारायण पेठ येथे पोहोचले. त्यानंतर २१ जुलै रोजी तेलंगाणामधील नारायणपेठ जवळच्या डोंगराळ परिसरात जाऊन ते सर्वजण दारू पार्टी करत होते. त्यावेळी पार्टी करत असतानाच आरोपी राम पटेल हा त्याच्याकडील पिस्टल हाताळत असताना, त्यातील एक राऊंड चुकून फायर झाला. ती गोळी गुन्हेगार सुनील याच्या उजव्या खांद्यात घुसून त्यास गंभीर दुखापत झाली होती.


खोटी तक्रार दिल्याचे निष्पन्न: गोळीबारात जखमी झाल्याचे पाहून गुन्हेगार घाबरले. आता त्यांच्यावर तेलंगणा राज्यात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून तेलंगणावरून सर्वजण ट्रेनने रात्रीच निघून २२ जुलै रोजी दुपारी कल्याण रेल्वे स्टेशन येथे पोहोचले. त्यानंतर आरोपींनी जखमी अवस्थेत सुनील याला उपचारासाठी उल्हासनगर मधील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपींनी आपसात संगमत करून जखमी सुनील याच्या अंगावरील शर्ट, पॅन्ट पुरावा होईल म्हणून नष्ट केला. शिवाय डॉक्टर व पोलिसांना खोटी माहिती देऊन बदलापूर पोलीस ठाण्यात खोटी तक्रार दिल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले.


२१ जिवंत काडतूसे जप्त : या गुन्ह्यातील आरोपी, राम आशिष राजेंद्र पटेल याला २५ जुलै रोजी अटक केली. तर रेहान अब्दुल युसूफ खान याला २६ जुलै रोजी अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून कौशल्यपूर्वक तपास करून ३ पिस्टल, ६ रिकाम्या मॅक्झिन आणि २१ जिवंत काडतूसे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस उप आयुक्त डॉ. सुधाकर पठारे यांनी दिली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वपोनि अनिल पडवळ हे करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Crime News : 'माझी बायको दहशतवादी आहे', पत्नीपासून सुटका मिळवण्यासाठी पतीची अजब युक्ती!
  2. College Girl Killed In Delhi : दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीचा खून, रॉडने वार करुन मृतदेह टाकला बाकड्याखाली
  3. Nagpur Crime News: बेपत्ता झालेल्या 'त्या' दोघांच्या खूनाचे गूढ उकलले; नदी पात्रात सापडला एकाचा अर्धवट जळालेला मृतदेह
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.