ETV Bharat / state

climate clock : क्लायमॅट क्लॉक लावा पृथ्वीचा नाश टाळा; प्राध्यापक चेतन सोलंकी यांची भन्नाट मोहीम

author img

By

Published : Aug 16, 2023, 10:54 PM IST

आजपासून पुढील पाच वर्षांमध्ये आपण ग्लोबल वार्मिंगला थांबवण्यासाठी प्रयत्न केला नाही तर, पृथ्वीचे तापमान हे दीड डिग्रीपर्यंत वाढू शकते. संपूर्ण मानव जातीला त्याचा मोठा धोका होऊ शकतो. शेतीमधून अन्नधान्य मिळणेच बंद झाले तर? म्हणूनच उपाय करण्यासाठी आयआयटी मुंबईचे प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी क्लायमॅट क्लॉक मोहीम सुरू केली आहे.

climate clock
क्लायमेट क्लॉक

माहिती देताना प्राध्यापक चेतन सोलंकी

मुंबई : पाच वर्षानंतर येणारा धोका रोखायचा असेल तर आयपीसीसी अर्थात 'इंटर गव्हर्मेंटल पॅरंटल अन क्लायमॅट चेंज'(IPCC) जागतिक हवामान बदलाबाबत शास्त्रज्ञांचे, तज्ञांचे मंडळ आहे. त्यांच्या अहवालामध्ये इशारा दिला गेला आहे की, पृथ्वीचे तापमान दीड अंश सेल्सिअस पर्यंत किंवा त्याच्या पुढे वाढले तर वेगाने हवामान बदल होईल. याचा शेती, पाणी, आरोग्य, अन्न, उद्योग संपूर्ण मानव जातीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.


अशी आहे ही मोहीम : आयआयटी मुंबईचे पर्यावरण व तंत्रज्ञानाचा अभ्यास करणारे प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी वातावरण आणि हवामानबदल यातील प्रदूषण रोखण्यासाठी अनोखी मोहीम सुरू केली आहे. उष्णतेच्या लाटा, चक्रीवादळ, दुष्काळ, जंगलातील आग, हे मानवी हस्तक्षेपामुळे वाढलेले आहे. ते रोखण्यासाठी 'क्लायमॅट क्लॉक' नावाने त्यांनी अभियान सुरू केले आहे. लवकरच ही मोहीम महाराष्ट्रात येणार आहे.


सार्वजनिक ठिकाणी उपयोगी हे क्लॉक : स्कायमेट क्लायमॅट क्लॉक असे हे घड्याळ आहे. मंत्रालय, प्रत्येक सरकारी कार्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानके, शाळा, मंदिर, मज्जिद, गुरुद्वारा, या ठिकाणी मोठे घड्याळ लावले जाईल. त्या ठिकाणी कार्बनचे प्रमाण किती आहे. तसेच पाच वर्षानंतर पृथ्वी आणि आपण कुठे असणार आहोत, कार्बन डाय-ऑक्साइडची रोजची स्थिती ही क्लॉक मध्ये क्षणाक्षणाला समजणार आहे.



धोक्याचा इशारा देणार क्लायमॅट क्लॉक : प्राध्यापक चेतन सोलंकी यांनी सांगितले की, हवामान बदल सुरू होऊन त्याचे वाईट परिणाम आपण पाहतो आहे. "क्लायमॅट क्लॉक" आपल्याला धोक्याचा इशारा दर सेकंदाला देते. पाच वर्षानंतर पृथ्वी कशी आणि कोठे असेल, किती डिग्री तापमान वाढले. यांची माहिती आता क्लॉक मध्ये मिळणार आहे. हे घड्याळ मुख्यतः दोन निकषांवर आधारित आहे. जगात आणि भारतात किती कार्बन-दर सेकंदाला सोडला जातो. त्याचे मोजमाप त्यामध्ये केले जाते. दीड डिग्री तापमान पृथ्वीवर असण्यासाठी 23 कोटी टन कार्बन डाय-ऑक्साइड वायू हवेत सोडू शकतो. ही मर्यादा IPCC ने घातली आहे. आता रोज किती गतीने कार्बन उत्सर्जन होतो. तर 14 लाख किलोग्राम प्रति सेकंद कार्बन डाय-ऑक्साइड रोज हवेत सोडला जातो. त्यावर प्रतिबंध आणावा म्हणून प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी हे क्लॉक बसवले पाहिजे. तसेच स्वच्छ ऊर्जा आणि सूर्य उर्जेवर आपल्याला भर द्यावा लागणार.

हेही वाचा -

  1. Earth Balance Disturbed: पृथ्वीला ताप आला आहे, विद्यार्थ्यांना याची जाणीव झाली पाहिजे : डॉ. संस्कृती मेनन
  2. Methane Lab : 'येथे' मिथेनवर सुरुये संशोधन; भारतातील एकमेव लॅब असल्याचा दावा
  3. Air Pollution Heat Affect Sleep : वायू प्रदूषण, वाढत्या तापमानामुळे होऊ शकते झोपमोड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.