ETV Bharat / state

Thane Crime News : वीज पुरवठा खंडित करणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

author img

By

Published : Aug 15, 2023, 4:15 PM IST

Thane Crime News
बेदम मारहाण

महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण झाल्याच्या घटना अनेकदा ग्रामीण भागात पाहायला मिळतात. अशीच एक धक्कादायक घटना आता डोंबिवलीजवळील शिळफाटा रस्त्यावरील निळजे गावात घडली आहे. यात एका कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे, तर महिलेला शिवीगाळ करण्यात आली.

ठाणे : महावितरणच्या वीज देयक तपासणी पथकाने या ग्रामस्थाला वीज देयक भरण्यासाठी तगादा लावला होता. तरीही ग्रामस्थ थकीत वीज देयक भरणा करत नव्हता. अखेर पथकाने त्याच्या घराचा वीज पुरवठा खंडित करताच संबंधित ग्रामस्थाने महावितरणच्या पुरुष कर्मचाऱ्याला बेदम मारहाण करुन महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. ही घटना निळजे गावात घडली आहे.


मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल : मानपाडा पोलीस ठाण्यात महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांच्या तक्रारीवरून बेदम मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष एकनाथ पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या वीज ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या विरुध्द सरकारी कामात अडथळा आणणे, मारहाण, शिवीगाळ केल्याची तक्रार महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते यांनी तक्रार मानपाडा पोलीस ठाण्यात दिली.



वीज पुरवठा खंडित केला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याण विभागातील महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ आकाश पराते (वय ३३), विद्युत साहाय्यक रोशनी पाटले, दिगंबर खंडाळकर, केशव मराठे हे साहाय्यक अभियंता चौधरी यांच्या आदेशावरुन वीज देयक थकीत रक्कम वसुल करण्यासाठी निळजे गावात शुक्रवारी सकाळी आले होते. ग्राहकांना समज देऊन त्यांना थकीत रक्कम तातडीने भरण्याची सूचना पथकाकडून केल्या जात होत्या. एकनाथ लडकू पाटील यांच्याकडे मोठ्या रकमेची वीज देयक थकबाकी होती. त्यांना यापूर्वी पथकाने देयक भरणा करा, अन्यथा वीज पुरवठा खंडित केला जाईल, अशी तंबी महावितरणकडून देण्यात आली होती.


शिवीगाळ करत केली मारहाण : एकनाथ पाटील वीज देयक भरण्याच्या मनस्थितीत दिसत नसल्याने महावितरणच्या पथकाने शुक्रवारी पाटील यांच्या घराचा वीज पुरवठा खंडित केला. त्यावेळी घरातून एकनाथ यांचा मुलगा संतोष रागाने बाहेर आला. त्याने तंत्रज्ञ आकाश पराते यांना वीज पुरवठा का तोडला. तो पुन्हा जोडून दे, असे बोलून शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या प्रकाराचे मोबाईलमधून व्हिडिओ रोशनी पाटले करत होत्या. त्यांनाही संतोष यांनी शिवीगाळ केली. महावितरणच्या वरिष्ठांना माहिती मिळताच ते निळजे गावात दाखल झाले. त्यांच्या आदेशावरुन संतोष पाटील विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

आकडे टाकून वीज चोरी : काही महिन्यापूर्वी मलंग पट्ट्यातील काकोळे गावात महावितरणच्या पथकाला थकबाकीदार ग्रामस्थांनी बेदम मारहाण केली होती. हिललाईन पोलीस ठाण्यात ग्रामस्थांविरुध्द गुन्हा दाखल आहे. ग्रामीण भागात बहुतांशी वीज ग्राहक हे वीज वाहिनीवर आकडे टाकून चोरुन वीजेचा वापर करतात. अशा प्रकारे महावितरणचे आर्थिक नुकसान करत असल्याच्या तक्रारी आहेत.



हेही वाचा -

  1. Crime News : चोरीच्या आरोपावरून दुकानदाराची अल्पवयीन मुलाला नग्न करुन बेदम मारहाण
  2. Watch Video : मुस्लिम विद्यापीठात तरुणाला बेल्टने बेदम मारहाण; पायावर नाक घासायला लावले
  3. Crime News : चोरीसाठी तरुणाला 'तालिबानी शिक्षा', बेदम मारहाण, कपडे फाडून केले मुंडन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.