ETV Bharat / bharat

Crime News : चोरीसाठी तरुणाला 'तालिबानी शिक्षा', बेदम मारहाण, कपडे फाडून केले मुंडन

author img

By

Published : Aug 7, 2023, 3:39 PM IST

बिहारच्या गया जिल्ह्यात लोकांनी एका तरुणाला चोरीच्या आरोपाखाली पकडले. त्यानंतर लोकांनी तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तेथेच बेदम मारहाण केली. त्यांनी त्याचे कपडे फाडले, त्याचे मुंडन केले आणि नंतर त्याला हातपंपाला बांधले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (mob lynching in gaya)

mob lynching
मॉब लिंचिंग

गया : बिहारच्या गयामध्ये माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. येथे लोकांनी चोरीच्या आरोपाखाली एका तरुणाला तालिबानी शिक्षा दिली. जमावाने आधी तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचे कपडे काढले आणि त्याच्या मिशा कापून मुंडन केले. नंतर त्याला हातपंपाला बांधले. दरम्यान, तो तरुण वेदनेने रडत राहिला आणि दयेची याचना करत राहिला, मात्र त्याचे कोणीही ऐकले नाही. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकरणी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

युवकाला चोरी करताना पकडले : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील मुरारपूर परिसरातील आहे. हा व्हिडिओ शुक्रवार दुपारचा म्हणजेच ५ ऑगस्टचा आहे. हा तरुण मुरारपूर परिसरातील एका घरात चोरीच्या उद्देशाने घुसला होता. या दरम्यान घरातील लोकांनी त्याला चोरी करताना रंगेहाथ पकडले. यानंतर स्थानिक लोकांनी त्याची झडती घेतली. त्यांनी त्याच्याकडून मोबाईल आणि इतर काही वस्तू जप्त केल्या. यानंतर लोकांनी तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्याऐवजी तेथेच बेदम मारहाण केली. यानंतरही त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी त्याचे कपडे फाडले. लोकांनी त्याचे मुंडन केले, त्याच्या मिशा आणि भुवया कापल्या आणि नंतर त्याला गावातीलच हातपंपाला बांधले.

पोलिसांनी एफआयआर नोंदवला : घटनेची माहिती मिळाल्यानंतर गया पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. एसएसपीच्या सूचनेनंतर कोतवाली पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला गेला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची पडताळणी आणि तपासासाठी आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

घटनेचा व्हिडिओ प्राप्त झाला आहे. चोरीच्या आरोपावरून काही लोकांनी एका तरुणाला पकडले आणि दोरीने बांधून त्याचे मुंडन केले. या प्रकरणी एफआयआर नोंदवला आहे. या घटनेत गुंतलेल्या लोकांची ओळख पटली आहे. व्हायरल व्हिडिओच्या पडताळणीनंतर दोषींना सोडले जाणार नाही. - आशिष भारती, एसएसपी, गया

पीडिताने अद्याप तक्रार केली नाही : पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक स्थापन केले आहे. शहर पोलीस अधीक्षक, शहर डीएसपी, कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रमुख यांचा विशेष पथकात समावेश करण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्याच्या सूचनाही कोतवाली पोलिस ठाण्याला देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी पीडिताने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी अद्याप पोलिस ठाण्यात तक्रार केलेली नाही.

हेही वाचा :

  1. Thane Crime : 2 वर्षाच्या चिमुरडीवर 15 वर्षीय मुलाचा लैंगिक अत्याचार, वारंवार करत होता असे कृत्य
  2. Crime News : चोरीच्या आरोपावरून दुकानदाराची अल्पवयीन मुलाला नग्न करुन बेदम मारहाण
  3. Crime News : अमानुषतेचा कळस! मुलांना लघुशंका प्यायला लावत प्रायव्हेट पार्टवर मिरची लावली, Watch Video
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.