ETV Bharat / state

Thane Crime News: नवी मुंबईतील 'त्या' बिल्डरच्या खून प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By

Published : Mar 21, 2023, 11:16 AM IST

Thane Crime News
बिल्डरच्या खून प्रकरणातील आरोपी

नवी मुंबई नेरुळ सेक्टर सहा येथील सावजी पटेल या बांधकाम व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. ही घटना 15 मार्चला घडली होती. या खून प्रकरणातील आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे.

प्रतिक्रिया देताना नवी मुंबई आयुक्त मिलिंद भारंबे

नवी मुंबई : शहरात खून, चोरी, अपहरण या घटनांचे वाढते प्रमाण आहे. नुकतेच एका बांधकाम व्यावसायिकाची देखील हत्या करण्यात आली. या खूनप्रकरणात सामील असणाऱ्या तीन आरोपींना पकडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. ही हत्या जमिनीच्या वादातून झाली असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येसाठी तब्बल पंचवीस लाख रुपयांची सुपारी मोजण्यात आली होती. गावाकडील झालेल्या वादातून ही हत्या केल्याचे उघड झाले आहे.

गोळ्या झाडुन हत्या : १५ मार्चला नेरूळ सेक्टर ६ सारसोळे अपना बाजार मार्केटचे समोर रोडवर सायंकाळी सुमारास बांधकाम व्यावसायिक सवजीभाई गोकर मंजेरी (वय ५६) या बांधकाम व्यावसायिकाची दोन अज्ञात व्यक्तींनी मोटार सायकलवर येवून भर रस्त्यात गोळ्या झाडुन हत्या केली होती. ते पळून गेले. या संदर्भात नेरुळ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. नवी मुंबई पोलिसांनी वेगवेगळी तपास पथके तयार करुन गुन्हेगारांचा शोध सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली.

तीन आरोपींना अटक : आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या मोटार सायकलचा शोध घेतला. तेव्हा त्यांना मेहेक जयरामभाई नारीया ( वय २८) राजकोट गुजरात येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती या हत्येचा उलगडा झाला. या आरोपीला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आली आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने कौशल यादव (वय 18), गौरव कुमार यादव (वय 24) आणि सोनू कुमार यादव (वय 23) या तीन आरोपींना अटक केली आहे.




हत्येचे मूळ : अटक केलेला आरोपी मेहेक जयरामभाई नारीयायाने दिलेल्या माहितीनुसार, बचूभाई धना पटणी या व्यक्तीचा मृत सावजी पटेल याने १९९८ साली मुळ गावी गुजरात येथे खून केला होता. तसेच नोव्हेंबर २०२२ मध्ये आरोपी व त्याच्या नातेवाईकांनी गुजरात राजकोट येथील साई या मुळ गावी काही माणसांना पाठवून भरचौकात मारहाण केली होती. १५ मार्च रोजी, सावजी पटेल मंजेरी सीबीडी-बेलापूर निवासस्थानी जाण्यासाठी त्यांच्या कारमध्ये बसले, तेव्हा दुचाकीवरील दोन पुरुष त्याच्या एसयूव्ही गाडीजवळ थांबले. सावजीवर तीन गोळ्या झाडल्या. वैयक्तिक वैमनस्य आणि जमिनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले. बिहार राज्यातील मारेकऱ्यांना बोलवून या हत्येची २५ लाख रुपयांची सुपारी दिली होती.

हेही वाचा : Satara Crime News: शिवसेनेच्या माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुखांच्या बेछूट गोळीबारात दोघांचा मृत्यू; काय आहे नेमके कारण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.