ETV Bharat / state

Year Ender 2021 Solapur : सोलापूर 2021 मागोवा- जिल्ह्यातील 'या' घटना राहिल्या चर्चेत

author img

By

Published : Dec 31, 2021, 8:23 PM IST

जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम करणारे अनेक घडामोडीही ( Year Ender 2021 Solapur ) वर्षाच्या अखेरपर्यंत घडल्या आहेत. पोटनिवडणुकीनंतर पंढरपूरसह ( Bypoll Pandharpur Mangalvedha Assembly ) चार तालुक्यात कोरोना हाहाकार माजवला होता. करमाळा तालुक्यातील बिबट्याची दहशत ( Leopard in Karmala Taluka ) यावर्षी पाहायला मिळाली. अवकाळी पावसामुळे फळबागायती शेतीचे मोठे नुकसान झाले.

Year Ender 2021 Solapur
Year Ender 2021 Solapur

पंढरपूर - राज्याच्या राजकारणामध्ये बहुचर्चित राहिलेला मतदारसंघ म्हणून 2021 साली पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक आवर्जून लक्षात राहण्यासारखी राहिली. वैष्णवांचे आराध्य दैवत असणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील चालू बंद अवस्थेतील मंदिरही या वर्षात वारकरी संप्रदायांनी पाहिले. त्याचबरोबर श्री विठुरायाची कार्तिकी यात्रा ही दोन वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या संख्येने भरली.

पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, माळशिरस, करमाळा, माढा आणि बार्शी तालुक्यातील अनेक घटना सरत्या वर्षात राज्याच्या नकाशावर ठळकपणे झळकल्या आहेत.

  1. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक ( Bypoll Pandharpur Mangalvedha Assembly ) - पंढरपूर मंगळवेढ्याची आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचा निवडणुकीचा निकाल दोन मे रोजी लागला. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्यावतीने आमदार समाधान आवताडे यांना तिकीट देण्यात आले. तर महाविकास आघाडीच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात आले होते. या पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या निवडणुकीचा राजकीय धुरळा अवघ्या महाराष्ट्राने यावेळेस अनुभवला होता. अटीतटीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे समाधान आवताडे अवघ्या 3700 मतांनी विधानसभेत पोहोचले. त्यांच्या विजयामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
  2. विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले ( Pandharpur Vitthal Temple ) - वैष्णवांच्या आराध्य दैवत असणार्‍या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर 5 एप्रिलपासून कोरोना पार्श्वभूमीवर मंदिर समितीने सुमारे तीन महिने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे या सरत्या वर्षात श्री विठुरायाचे मंदिर बंद व चालू असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे विठुरायाची आषाढी यात्रा ही साधी पद्धतीने जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आली होती. विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांसाठी ऑक्टोंबर महिन्यात पुन्हा खुले करण्यात आले. यावेळी कोरोना संदर्भातील नियम आतही शीतलता आणण्यात आली होत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आषाढी महापूजा संपन्न झाली होती. दोन वर्षानंतर सुमारे कार्तिकी यात्रेचा सोहळा हा विठुरायाच्या दरबारी बनवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली होते. त्यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची लाखो भाविकांची कार्तिकी यात्रा मोठ्या थाटामाटात यावर्षी पार पाडण्यात आली.
  3. करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत ( Leopard in Karmala Taluka ) - जानेवारीच्या पहिल्याच महिन्यात करमाळा तालुक्यात बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्याने सुमारे बारा नागरिकांचा बळी घेतला होता. त्यावेळी त्याला संपवण्यासाठी वन विभागाच्यावतीने नेटाने प्रयत्न करण्यात आले होते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिबट्याला ठार करण्यासाठी प्रशिक्षक असणारे शार्प शूटर तैनात करण्यात आले होते. सुमारे वीस दिवसानंतर धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या बंदुकीचा शिकार बिबट्या झाला होता. त्यानंतर करमाळा तालुक्यातील दहशत काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली.
  4. सांगोला तालुक्यातील राजकारणातील महामेरू हरवला ( MLA Ganpat Deshmukh Death ) - शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार गणपत देशमुख यांचे यावर्षी दुःखद निधन झाले. सांगोला मतदार संघातून तब्बल 55 वेळा आमदारकी भूषवणारे आमदार गणपत आबा देशमुख राज्यातील एकमेव आमदार होते. त्यांच्या निधनानंतर अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. अशा लोकप्रिय नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी सांगोला नगरीमध्ये अलोट जनसमुदाय लोटला होता. माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनामुळे राज्यातील कामगारांचा नेता हरवल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले होते.
  5. मोहिते पाटील विरुद्ध मोहिते पाटील संघर्ष ( Solapur district election ) - सोलापूर जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामीणस्तरावरील राजकारण सरत्या वर्षात जिल्ह्यातील नागरिकांनी पाहिले. यामध्ये प्रामुख्याने अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यातील राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरली होती. यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व काँग्रेसचे नेते धवलसिंह मोहिते-पाटील यांच्यात सरळ लढत अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळाली होती. यामध्ये विजयसिंह मोहिते-पाटील गटाने दणदणीत विजय मिळवून अकलूज ग्रामपंचायत निवडणुकीची एक हाती सत्ता राखण्यात यश आले होते.
  6. विठ्ठल सहकारी कारखाना आर्थिक तंगीमुळे ( Vitthal Sugar factory closed ) बंद- पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी कारखाना शेतकऱ्यांच्या थकित बिलापोटी बंद ठेवण्यात आला. यामुळे श्री विठ्ठल कारखाना हा संचालक मंडळाच्या चुकीच्या धोरणामुळे बंद ठेवण्यात आला. या कारखान्याची चर्चा सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर यंदाच्या वर्षी झाली. साखर आयुक्तांकडून श्री विठ्ठल कारखान्याच्या जप्तीच्या नोटिसा ही काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातील चंद्रभागा सहकारी कारखाना याला राज्य शासनाकडून आर्थिक बळ देण्यात आली होती. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील सहकार चळवळ वाचवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न करण्यात आले.
  7. उजनी धरणातील पाणीसाठ्यामुळे पालक मंत्र्यांविरोधात ( Ujani Water issue ) शेतकऱ्यांचा आक्रोश- सोलापूर जिल्ह्यातील उजनी जलसाठातून इंदापूर तालुक्यातील शेतीसाठी पाणी सोडल्याने पालकमंत्री दत्ता भरणे यांच्याविरोधात पंढरपूर, माळशिरस, करमाळा, माढा या तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. यातूनच सोलापूर जिल्ह्यातील राजकारण पूर्णपणे ढवळून निघाले होते. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीकडून मोठे आंदोलन उभा करण्यात आले होते. या उजनी जलसाठा त्यातील पाण्याची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना घेण्यात घ्यावी लागली होती. त्यांच्या आदेशानंतर सदर उजनी जलाशयातील पाणी सोडण्याची प्रक्रिया रद्द करण्यात आली होती.
  8. पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कोरोना कहर ( corona crisis in Pandharpur Mangalwedha ) - पंढरपूर मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली होती. त्यानंतर दोन मे रोजी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल लावण्यात आला. पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत प्रचारासाठी प्रचार सभेत लोकांनी हा म्हणून गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे वाढल्याचे चित्र पाहायला मिळाले. या गर्दीतूनच पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील गावाच्या गाव कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडला होता. यामुळे राज्यातून निवडणुकीसंदर्भात मोठी टीकाही सहन करावी लागली होती.
  9. अवकाळी पावसामुळे फळबागांचे अतोनात नुकसान- सरत्या वर्षातील ऑक्टोंबर व नोव्हेंबर या कालावधीमध्ये पंढरपूर, मंगळवेढा, माळशिरस, माढा, करमाळा, सांगोला तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली होती. तर बार्शी तालुक्यात पावसाने हाहाकार माजवला होता. यातूनच नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या फळबागाचे अतोनात नुकसान झाले होते. आधीच कोरोनामुळे मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने मोठा फटका दिला. द्राक्ष, डाळिंब, केळी अशा फळबागांचे अवकाळी पावसात वाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाली.
  10. सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत संभ्रम ( MLA Prashant Paricharak ) - सोलापूर परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांची मुदत 15 डिसेंबर रोजी पूर्ण होणार होती. राज्यातील इतर सात विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. मात्र सोलापूर जिल्ह्यातील अकलूज, नातेपुते, श्रीपूर बोरगाव व वैराग या नव्याने स्थापन झालेल्या नगरपंचायतमुळे सोलापूर विधानसभेची निवडणूक निवडणूक आयोगाकडून पुढे ढकलण्यात आली होती. तर सोलापूर विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये यंदाचे वर्ष ऐतिहासिक ठरले. त्याचबरोबर विधानसभेतही पंढरपूर मंगळवेढा अवैधरित्या धंद्यांचा मुद्दा गाजला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.