ETV Bharat / state

भंडाऱ्यातील घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचे पितळ उघड पडले - दरेकर

author img

By

Published : Jan 10, 2021, 4:58 PM IST

Updated : Jan 10, 2021, 6:18 PM IST

प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर

भंडारा जिल्ह्यातील रुग्णालयात घडलेल्या घटनेत दहा बाळांचे जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली त्यानंतर राज्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर केली आहे.

सोलापूर - भंडारा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात झालेल्या आगीच्या घटनेमुळे दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे. याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेता प्रवीण दरेकर यांनी संताप व्यक्त करत राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. या घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा पितळ उघडकीस आला आहे.

बोलताना प्रवीण दरेकर

रविवारी (दि. 10 जाने.) सकाळी पंढरपूरमार्गे प्रवीण दरेकर सोलापूर दौऱ्यावर आले होते. हेरिटेज मंगल कार्यालयात एक खासगी कार्यक्रम आटोपून त्यांनी अल्प काळ पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भंडारा घटनेवर संताप व्यक्त केला.

राज्य सरकारचा नाकर्तेपणा

भंडारा जिल्ह्यातील घटनेमुळे राज्यातील आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या घटनेला सरकारचा सर्वस्वी नाकर्तेपणा जबाबदार आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे या दहा नवजात बाळांचा मृत्यू झाला आहे, असे दरेकर म्हणाले.

त्या बाळांचे जीव वाचले असते

भंडाऱ्यातील त्या रुग्णालयाची अलार्म व्यवस्था, फायर व्यवस्था आणि इलेक्ट्रीक व्यवस्था योग्य असली असती तर त्या बाळांचे प्राण वाचले असते, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

बैल गेला आणि झोपा केला

दहा बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग आली असून आता राज्यातील रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याच्या सूचना सरकार देत आहेत. बैल गेला आणि झोपा केला, अशी अवस्था झाली आहे.

हेही वाचा - महिनाभर चालणारी सिद्धेश्वर यात्रा केवळ चार दिवसांची

हेही वाचा - अकलूज येथे मोहिते-पाटील विरुद्ध मोहिते-पाटील लढत

Last Updated :Jan 10, 2021, 6:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.