ETV Bharat / state

Uday Samant On Vinayak Raut : उदय सामंतांनी भर पत्रकार परिषदेत दाखवले विनायक राऊतांचे अन आंबेकरांचे फोटो

author img

By

Published : Feb 11, 2023, 9:32 PM IST

Uday Samant On Vinayak Raut
उदय सामंत

रत्नागिरी जिल्ह्यात शशिकांत वारीशे यांच्या हत्येप्रकरणी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वक्तव्य केले आहे. संशयीत आरोपी सोबत अनेक राजकारण्याचे फोटो आहेत. आंबेकर अतिशय हुशार व्यक्ती आहे. त्याने विविध राजकारण्यासोबत फोटो काढून ठेवले आहेत. त्याच्यासोबत माझा फोटो असेल तर, मी संशियीत झाले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते आज सोलापूर जिल्ह्याच्या दौवऱ्यावर होते.

उदय सामंत

सोलापूर : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे सोलापूर दौऱ्यावर आले होते. एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत बैठकीनंतर उदय सामंतांनी शासकीय विश्रामगृह येथे सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. रत्नागिरी जिल्ह्यात शशिकांत वारीशे पत्रकाराच्या हत्ये मागे कुणाचा हात आहे, संशयीत आरोपी सोबत तुमचे फोटो आहेत, असा प्रश्न विचारला असता, संशयीत आरोपी आंबेकर हा अतिशय खूप हुशार व्यक्ती आहे. अनेक राजकारण्यांसोबत, नेत्यांसोबत त्याने फोटो काढून ठेवले आहेत. माझा फोटो त्यासोबत असला तर, मी संशयीत आरोपी झालो का? असा प्रश्न उदय सामंत यांनी विचारला. पत्रकार खुनातील अटक असलेल्या संशयीत आरोपीने खासदार विनायक राऊत यांसोबत देखील फोटो आहे. हे फोटो पाहून आम्ही खा. विनायक राऊत यांवर आरोप केले नाही. असले घाणेरडे राजकारण मला करावयाचे नाही.असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

खुनाचा गुन्हा दाखल करण्यात पुढाकार : रत्नागिरी जिल्ह्यात ज्यावेळी शशिकांत वारीशे याचा मृत्यू झाला त्यावेळी मी स्वतः पुढाकार घेतला. पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी यांना भेटून गुन्हा दाखल करण्यासाठी सुचना दिल्या. भा.द.वि. 304 प्रमाणे गुन्हा होता. मी स्वतः माहिती घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुढाकार घेतला, असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

मागणीच समर्थन करतो : उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आंबेकर, विनायक राऊत यांचा एकत्रित फोटो दाखवत विरोधकांना इशारा दिला आहे. माझ्याकडे देखील आंबेकर सोबत असलेले अनेक नेत्यांचे फोटो आहेत. मला याच राजकारण करायचे नाही. कारण एका पत्रकाराचा मृत्यू झाला आहे. असले घाणेरडे राजकारण मी करत नाही. पण ज्या वेळी आपण दुसऱ्यावर एक बोट करतो तर, आपल्याकडे तीन बोट असतात, याच भान असले पाहिजे. आंबेकर या व्यक्तिवर कडक कारवाई झाली पाहिजे ही माझी भूमिका काल देखील होती. आज देखील हीच भूमिका कायम असणार आहे असे उदय सामंत म्हणाले. विनायक राऊत, राजन साळवी यांनी पत्रकाराच्या घरी जाऊन जी मागणी केली त्याच मी समर्थन करत आहे असेही उदय सामंत म्हणाले.


हेही वाचा - CM Lunch Farm : शेतामध्ये हातात भाकरी घेऊन मुख्यमंत्र्यांनी केले जेवण; कनेरी मठाला भेट देऊन घेतला लोकोत्सव तयारीचा आढावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.