ETV Bharat / state

मराठा आरक्षणाला विरोध नाही, पण ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये - छगन भुजबळ

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 10:43 PM IST

Chhagan Bhujbal On Manoj Jarange
मनोज जरांगे आणि छगन भुजबळ

Chhagan Bhujbal On Manoj Jarange : मराठा आरक्षणाला विरोध नाही. पण, ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळणार नसल्याचा पुनरुच्चार ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय. ओबीसींचा एल्गार मेळावा शनिवारी (6 जानेवारी) पंढरपूर येथे पार पडला.

पंढरपूर (सोलापूर) Chhagan Bhujbal On Manoj Jarange : आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. मात्र, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी पंढरपूर येथील ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये व्यक्त केलं. पंढरपूर येथील टिळक स्मारक मैदानावर ओबीसी एल्गार मेळावा मंत्री छगन भुजबळ, गोपीचंद पडळर, महादेव जानकर, प्रकाश शेंडगे आणि ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला.

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा पण...: मागील काही दिवसापासून मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यामध्ये शाब्दिक चकमक होत आहे. आज एल्गार मेळाव्याच्या निमित्तानं छगन भुजबळ काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, मात्र ओबीसी मधून संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असं ठणकावून सांगत एल्गार सभा छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत गाजवली.

नाव न घेता केली टिका : एल्गार मेळाव्याला संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून ओबीसी बांधव उपस्थित होते. त्यांना संबोधित करताना जरांगे पाटील यांच्या मुंबई भेटी दौऱ्यावर टीका करत, गरीब लोक मुंबईला 200 गाड्या घेवून जागेची पाहणी करण्यास गेले. यांच्या सभेवर 200 जेसीबी घेऊन फुलांची उधळण होते, अशी उपासात्मक टीका त्यांनी जरांगे पाटील यांचं नाव न घेता केली.

मराठा आरक्षणाला विरोध नाही : मराठा आरक्षणाच्या विरोधात मी थांबायला तयार आहे, पण ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षणाचा वाटा मागणं ही चूक आहे. ते त्यांना थांबवायला सांगा मी थांबायला तयार आहे, असं आवाहनही छगन भुजबळ यांनी केलं. माझा मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नाही. सर्वांचीच जात गणना करा आणि 'दूध का दूध, पाणी का पाणी' होऊ द्या, असं म्हणत त्यांनी सरकारवर ही निशाणा साधला. तसेच पडळकर यांनीही एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून ओबीसी समाजाच्या भावना व्यक्त केल्या.

ओबीसी समाजाचा लढा उभा करा : ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढण्यासाठी फक्त नेत्यांची जबाबदार नाही, तर सर्व नागरिकांनीही या लढ्यात सामील व्हावं, मराठा समाजाला जे ओबीसी समाजातून कुणबी दाखले दिले जात आहे त्या दाखल्यांवरती लक्ष ठेवा. जे खोटे सर्वेक्षण केले जाणार आहे त्यावरही लक्ष ठेवा. गावोगावी ओबीसी समाजाचा लढा उभा करण्याच्या आव्हानही, छगन भुजबळ यांनी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातून केलं आहे.

हेही वाचा -

  1. चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल; म्हशीवर बसून म्हणते चालली मुंबईला, मराठा आरक्षण येणार घेऊन
  2. छगन भुजबळ कुणाला म्हणाले 'अतिशहाणा त्याचा बैल रिकामा', वाचा सविस्तर
  3. मराठा समाजाच्या मागासलेपणाचं सर्वेक्षण सात दिवसात करा, राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.