ETV Bharat / state

KCR in Solapur : वारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यासाठी केसीआर यांना परवानगी नाही, केसीआर यांची जिल्हा प्रशासनावर नाराजी

author img

By

Published : Jun 26, 2023, 5:52 PM IST

KCR in Solapur
तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव

तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे मंगळवारी पंढरपूर येथे दाखल होणार आहेत. बीआरएस पक्षातर्फे वारकऱ्यांवर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे रीतसर परवानगी मागितली होती. पण जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही. यामुळे बीआरएस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.

माहिती देताना माणिक कदम

सोलापूर : लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने निघाले आहेत. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे सोमवार व मंगळवार असे दोन दिवस सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सोलापुरातील सर्वच हॉटेलमध्ये बुकिंग फुल्ल झाली आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे विठ्ठलाचे भक्त आहेत. आषाढी यात्रेनिमित्त मंत्र्यांसह शेकडो जणांचा ताफा सोलापुरात येणार असल्याने सोलापुरातील सर्वच प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. बीआरएस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनावर नाराजगी व्यक्त केली आहे. बीआरएस पक्षातर्फे वारकऱ्यांवर आकाशातून पुष्पवृष्टी करण्यासाठी जिल्हा प्रशासनकडे रीतसर परवानगी मागितली होती. पण जिल्हा प्रशासनाने प्रतिसाद दिला नाही अशी संतप्त प्रतिक्रिया माणिक कदम यांनी व्यक्त केली आहे.

केसीआर हे सोलापुरात मुक्कामी : केसीआर व त्यांचा तीनशे जणांचा ताफा सोलापुरातील विविध हॉटलमध्ये मुक्काम करणार आहेत. सोमवारची रात्र केसीआर व त्यांचे मंत्रिमंडळ सोलापुरातील विविध उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे सोलापूर शहरातील विविध ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केसीआर ज्या हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत, त्या हॉटेलमध्ये बॉम्ब शोधक पथकाने कसून तपासणी केली आहे.

सर्व व्हीआयपी दर्शन बंद करा : हिंदूराष्ट्र सेनेच्या पदाधिकऱ्यांनी केसीआर यांच्या व्हीआयपी दर्शनाला विरोध केला आहे. त्यावर बीआरएस प्रदेश अध्यक्ष माणिक कदम यांनी सर्वच नेत्यांचा व्हीआयपी दर्शन बंद करा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील व्हीआयपी दर्शन बंद करा अशी मागणी केली आहे.

केसीआर यांना का आहे आशा? - महाराष्ट्रातील सध्याची राजकीय अस्थिरता आणि शेतकरी- मजूर यांची असलेली नाराजी पाहता बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समितीला संधी असल्याचे राव यांना वाटत आहे. तेलंगाणामध्ये शेतकऱ्यांना मोफत वीज आणि पाणी या दोन महत्त्वाच्या गरजा पुरवल्यानंतर शेतकरी कामगार वर्ग हा बीआरएसच्या बाजूने उभा राहिला आहे. त्यामुळेच तेलंगाणामध्ये चंद्रशेखर राव हे सत्तास्थानी आहेत. महाराष्ट्रातील किंवा कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना आपल्याकडे वळवायचे असेल तर या दोन महत्त्वाच्या बाबी त्यांना दिल्या तर ते आपल्याकडे वळतील याचा अंदाज असल्याने, महाराष्ट्रातील शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला वळवण्यासाठी केसीआर यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा -

  1. KCR in Pandharpur : केसीआर मंत्रिमंडळासह पंढरपुरात; टॅक्सी पश्चिम महाराष्ट्रात धावणार का?
  2. KCR Maharashtra Visit Update : केसीआर सायंकाळपर्यंत सोलापुरात येणार; सुमारे ६०० वाहनांच्या ताफ्यासह एन्ट्री
  3. KCR Pandharpur Visit : केसीआर यांना विठ्ठलाचे व्हीआयपी दर्शन घेऊ देऊ नका; हिंदूराष्ट्र सेनेचा विरोध
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.