ETV Bharat / state

Ganeshotsav 2023 : सोलापूरमध्ये गेल्या वीस वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार साकारतोय बाप्पाची मूर्ती...

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 3:03 PM IST

Ganeshotsav 2023
मुस्लिम मूर्तीकार साकारतोय बाप्पाच्या मूर्ती

Ganeshotsav 2023 : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची (Ganpati Festival 2023) सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे. सोलापूर शहरात गेल्या वीस वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार मौलाली शेख गणपती बाप्पाची मूर्ती साकारत आहेत. (Muslim Artist Makes Ganesha Idol)

सोलापुरात मुस्लिम मूर्तिकार साकारतोय बाप्पाची मूर्ती

सोलापूर Ganeshotsav 2023 : नमाजची टोपी डोक्यावर घालून सोलापुरातील एक मुस्लिम व्यक्ती लाडक्या बाप्पाला शेवटचा हात देत आहे. वीस वर्षांपासून मुस्लिम मूर्तिकार मौलाली जाफर शेख (Ganesha Idols In Solapur) गणपती बाप्पा साकारत आहेत. मनात हिंदू धर्माबाबत आदर व्यक्त करत गणेश मूर्ती तयार करत असल्याची माहिती मौलाली शेख यांनी दिली. समाजात हिंदू आणि मुस्लिमांच्यात नेहमी शांततापूर्ण संबंध राहावे असंही मौलाली सांगतात. दोन समाजात तेढ निर्माण करून राजकारण करणाऱ्यांसाठी मौलाली हे सामाजिक एकोप्याचं उत्तम उदाहरण आहेत. सोलापूर शहरातील थोबडे वस्ती येथे मौलाली शेख हे बाप्पाच्या मूर्ती (Muslim Artist Makes Ganesha Idol) साकारत आहेत.

मुस्लिम असल्याचा न्यूनगंड कधीच बाळगला नाही : भारतात जातीय सखोल टिकून राहण्यासाठी पुढाकार घेतल्याची माहिती मौलाली शेख देतात. मुस्लिम असल्याचा न्यूनगंड कधीच मनात बाळगला नाही. समाजामध्ये वाढत चाललेला द्वेष, जातीय तेढ संपुष्टात येण्यासाठी मौलाली यांनी गेल्या वीस वर्षांपासून गणपती बाप्पा साकारण्याचं काम हाती घेतलं आहे. मौलाली शेख यांनी अशा अनोख्या पद्धतीने बाप्पा चरणी आपली सेवा अर्पण केली आहे.

लहानपणापासून बाप्पाच्या मूर्ती साकारण्याचा छंद : मौलाली शेख सोलापूरच्या मुस्लिम समाजात पाहिले असे कारागीर आहेत, ज्यांनी बाप्पाच्या मूर्ती साकारण्यात पुढाकार घेतला आहे. एक मुस्लिम युवक बप्पाच्या मूर्ती साकारताना क्वचित पाहावयास मिळतो. मौलाली जाफर शेख यांना लहानपणी बाप्पाच्या मूर्ती तयार करण्याचा छंद जडला. शालेय जीवनापासूनच याचे बाळकडू मिळाले. मौलाली यांचे कलाशिक्षक रविराज यांनी प्रोत्साहन दिले होते. त्या अनुषंगाने शालेय जीवनापासूनच त्यांनी यामध्ये रस दाखवला. आकर्षक गणपती बनवणे यात त्यांचा हातखंड असून दरवर्षी गणेश भक्तांमधून गणपती बनवण्यासाठी मागणी वाढली आहे.




सामाजिक संदेश मौलाली यांनी दिला : मौलाली शेख यांनी सौंदर्यपूर्ण असे गणपती साकारले आहेत. लाडक्या बाप्पावर आता ते शेवटचा हात फिरवत आहेत. याबाबत मौलाली शेख यांनी अधिक माहिती देताना समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होत असून, याला प्रतिबंध घालण्यासाठी त्यामध्ये सलोखा निर्माण व्हावा हा मुख्य उद्देश असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात जातीय दंगली होत आहेत. त्यावर देखील सामाजिक संदेश देत शांतता अबाधित ठेवा असा संदेश मौलाली शेख यांनी दिला आहे.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav २०२३ : 'बाप्पा'चा थाट; चांदीच्या मूर्ती, अलंकारांना ग्राहकांची मोठी मागणी
  2. Ganeshotsav २०२३ : गणरायाच्या आगमनाची तयारी जोरात; 'इको फ्रेंडली' मखरांकडं ग्राहकांचा कल
  3. Letter To Lalbaugcha Raja : 'बाप्पा, माझं चुकलं. मला माझी नोकरी परत मिळू दे..', भाविकानं लालबागच्या राजाला पत्र लिहून केला गुन्हा कबूल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.