ETV Bharat / state

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात दुप्पट विसर्ग; भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

author img

By

Published : Oct 12, 2021, 1:13 AM IST

Updated : Oct 12, 2021, 3:02 AM IST

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी 110 टीएमसी नोंद केली आहे. त्यामुळे उजनीचा जलाशय काठोकाठ भरल्याचा दिसून आला.

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात दुप्पट विसर्ग
उजनी धरणातून भीमा नदीपात्रात दुप्पट विसर्ग

पंढरपूर (सोलापूर) - भीमा नदीखोऱ्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरण क्षमतेपेक्षा जास्त ओव्हरफ्लो झाले आहे. उजनी जलाशयाने शंभरी गाठली आहे. भीमा नदी काठच्या गावांना अति सतर्कतेचा इशारा जलसंधारण विभागाकडून देण्यात आला आहे.

उजनी जलाशयातून सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास 40 हजार पाणी विसर्ग भीमा नदी पात्रात सोडला आहे. तसेच वीर धरणातून 5 हजार विसर्ग निरा नदीत सोडला. त्यामुळे सध्या भीमा नदी पात्रात सुमारे 48 हजारच्या आसपास क्‍यूसेस पाणी वाहत आहे. उजनी जलाशयातील 41 पैकी 16 दरवाजे 0. 35 सेंटिमीटरने उचलून वीस हजार पाणीसाठा भीमा नदीत सोडण्यात आला आहे.

उजनी धरणातून भीमा नदीपात्रात दुप्पट विसर्ग


हेही वाचा-12 ऑक्टोबर राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मानसिक स्वास्थ्य लाभेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

उजनी जलाशयामध्ये क्षमतेपेक्षा ओव्हर फ्लो
उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पाण्याच्या पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत उजनी धरणाची पाणी पातळी 110 टीएमसी नोंद केली आहे. त्यामुळे उजनीचा जलाशय काठोकाठ भरल्याचा दिसून आला. रविवारी उजनी धरणातून 20 हजार क्युसेक्स पाणी भीमा नदी सोडण्यात आले होते. सकाळच्या सत्रामध्ये भीमा नदी खोरे मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे भीमा नदीपात्रात चाळीस हजाराचा विसर्ग सोडण्यात आला. दौंड येथून बारा हजार विसर्ग उजनी जलाशयमध्ये येत आहे.

हेही वाचा-भाडेकरुच्या धमक्यांना त्रासून घरमालकाची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येपूर्वी तयार केला व्हिडीओ


भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा-
गेल्या दोन दिवसांपासून पुणे, सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे. उजनी जलाशयातून भीमा नदी पात्रात चाळीस हजाराचा निसर्ग सोडण्यात आला आहे. नीरा नरसिंगपूर येथे भीमा नदी व नीरा नदी संगमावर 48 हजार विसर्ग भीमा नदी पात्रात वाहत आहे. पंढरपूर, मंगळवेढा, माढा, माळशिरस तालुक्यातील भीमा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा-भिवंडीत तीन गोदामांतून 'हुक्का' फ्लेवरचा 9 कोटी रुपयांचा साठा जप्त

Last Updated :Oct 12, 2021, 3:02 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.