ETV Bharat / state

शेतकऱ्यांचे नॅशनल हायवे कार्यालयासमोर आदोलन, भीमा नदीवरील बॅरेजचे काम पूर्ण करण्याची मागणी

author img

By

Published : Feb 22, 2022, 5:39 PM IST

Begumpur Farmers agitation in front of National Highway office
बेगमपूर शेतकरी आंदोलन राष्ट्रीय महामार्ग कार्यालय

सोलापूर दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांनी कोल्हापूर - सोलापूर महामार्गावर बेगमपूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची घोषणा केली होती. मात्र याचे काम महामार्ग ऑथोरिटीकडून रखडले आहे. पूर्वी या कामाचे खर्च 6 कोटी होते, आता बारा कोटी झाले आहे, असे कारण दाखवण्यात आले आहे. बेगमपूर येथील शेतकऱ्यांनी आज मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी नॅशनल हायवेच्या ( Begumpur Farmers agitation in front of National Highway office ) कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

सोलापूर - सोलापूर दौऱ्यावर असताना नितीन गडकरी यांनी कोल्हापूर - सोलापूर महामार्गावर बेगमपूर येथे भीमा नदीवर बॅरेज बांधण्याची घोषणा केली होती. मात्र याचे काम महामार्ग ऑथोरिटीकडून रखडले आहे. पूर्वी या कामाचे खर्च 6 कोटी होते, आता बारा कोटी झाले आहे, असे कारण दाखवण्यात आले आहे. बेगमपूर येथील शेतकऱ्यांनी आज मंगळवारी 22 फेब्रुवारी रोजी नॅशनल हायवेच्या ( Begumpur Farmers agitation in front of National Highway office ) कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन झाले. हे काम लवकर झाले नाही तर, सोलापूर - कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोखून आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे यांनी दिली.

माहिती देताना जिल्हा परिषद सदस्य आणि शेतकरी

हेही वाचा - Disha Salian Death Case : नितेश राणेंच्या ट्विटवर रूपाली चाकणकरांचे उत्तर, म्हणाल्या...

बॅरेज झाल्यास हजारो एकर शेतजमीन ओलिताखाली -

धरणे आंदोलनात बसलेल्या शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बेगमपूर येथे महामार्गावर बॅरेज बांधल्यास हजारो हेक्टर शेतजमीन ओलिताखाली जाणार आहे. हजारो शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. तरीही महामार्ग प्रशासन या कामासाठी टाळाटाळ करत आहे. यापूर्वी 29 नोव्हेंबर रोजी सोलापूर - कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आले होते. त्यावेळी महिनाभरात काम सुरू केले जाईल, अशी ग्वाही खुद्द राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती.

दोन वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी घोषणा केली होती -

दोन वर्षांपूर्वी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी भीमा नदीवर असलेल्या पुलाजवळ बॅरेज बांधण्याची घोषणा केली होती. सोलापूर ते कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तरी देखील बॅरेजचे काम सुरू करण्यात आले नाही. नॅशनल हायवेने याबाबत अंदाजपत्रक देखील तयार केले होते. पाटबंधारे विभागाने देखील नाहरकत प्रमाणपत्र दिले होते. तरीही नॅशनल हायवे ऑथोरिटी विभाग गेल्या वर्षाभरापासून बेगमपूर येथील भीमा नदीच्या पुलाजवळ बॅरेजचेत काम करण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणून आम्ही नॅशनल हायवेच्या कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करत आहे. आमची मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन आणि सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोखो आंदोलन करणार असल्याची माहिती यावेळी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे व इतर शेतकऱ्यांनी दिली.

हेही वाचा - शिवज्योत घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी दूध, अल्पोपहाराची मोफत सोय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.