ETV Bharat / state

पितृपक्ष पंधरवड्याने उमेदवारी अर्ज नाहीत दाखल, 194 जणांनी घेतले 277 अर्ज

author img

By

Published : Sep 28, 2019, 8:07 PM IST

Updated : Sep 28, 2019, 8:15 PM IST

माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघासाठी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. पण, पितृपक्ष पंधरवडा असल्यामुळे केवळ दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सोलापूर - जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत, अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. पितृपक्ष पंधरवडा सुरु असल्याने अनेकांनी उमेवारांनी अर्ज देखील घेतले नाहीत.

माहिती देताना जिल्हा निवडणूक अधिकारी

सोलापूर जिल्ह्यातील एकूण 11 विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकृतीचे काम सुरू झाले असून सर्व तहसील कार्यालयात अर्ज वाटप व स्वीकृती केली जात आहे. काल शुक्रवारी पहिल्याच दिवशी 11 विधानसभा मतदारसंघासाठी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तर फक्त दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अक्कलकोट विधानसभेसाठी गंगाराम कटकधोंड उर्फ वेंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सोलापूर दक्षिणसाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, बार्शीसाठी राजेंद्र राऊत, सांगोल्यासाठी दीपक साळुंखे-पाटील आणि मंगळवेढा-पंढरपूरसाठी समाधान आवताडे आणि शैला गोडसे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत.

Intro:mh_sol_01_election_form_7201168

पितृपक्ष पंधरवाडा मुळे उमेदवारी अर्ज दाखल नाहीत,
सोलापूर जिल्ह्यातील 194 जणांनी घेतले 277 उमेदवारी अर्ज

सोलापूर- जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. पितृपक्ष पंधरवडा असल्यामुळे अनेकांनी उमेवारांनी अर्ज देखील घेतले नाहीत. Body:विधानसभा निवडणुकीसाठी कालपासून उमेदवारी अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकारण्याचे काम सुरू झाले आहे सोलापूर जिल्ह्यात एकूण अकरा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज वाटप आणि अर्ज स्वीकृती चे काम सुरू झाले असून सर्व तहसील कार्यालयात अर्ज वाटप व स्वीकृती केली जात आहे काल पहिल्याच दिवशी 11 विधानसभा मतदारसंघासाठी 194 जणांनी 277 उमेदवारी अर्ज घेतले आहेत तर फक्त दोघांनीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
अक्कलकोट विधानसभेसाठी गंगाराम कटकधोंड उर्फ वेंकटेश स्वामी यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर पंढरपूर येथे सुदर्शन खंदारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सोलापूर दक्षिण साठी सहकारमंत्री सुभाष देशमुख बार्शी राजेंद्र राऊत सांगोल्यात दीपक साळुंखे-पाटील आणि मंगळवेढा पंढरपुर साठी समाधान आवताडे आणि शैला गोडसे या प्रमुख उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत

बाईट- डॉ- राजेंद्र भोसले , जिल्हा निवडणूक अधिकारीConclusion:
Last Updated :Sep 28, 2019, 8:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.