ETV Bharat / state

सिंधुदुर्गात उमेद अभियानातील हजारो महिला उतरल्या रस्त्यावर, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मूक मोर्चा

author img

By

Published : Oct 12, 2020, 7:16 PM IST

उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त्या न देण्याचा शासन निर्णयाला स्थगिती देऊन या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावे, या प्रमुख मागणीसह उमेद अभियानातील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला होता.

आंदोलनात सहभागी महिला
आंदोलनात सहभागी महिला

सिंधुदुर्ग - उमेद अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त्या न देण्याचा शासन निर्णयाला स्थगिती देऊन या कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत कायम करावे, अशी मागणी करत आज (दि. 12 ऑक्टोबर) उमेद अभियानातील ग्रामसंघ आणि बचतगटांच्या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढला. या मोर्चात हजारो महिलांनी सहभाग घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयावर अत्यंत शांततेत धरणेही धरली.

राज्य सरकारने उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत कंत्राटी स्वरुपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक पुनर्रनियुक्ती थांबविण्याचे आदेश दिल्यामुळे राज्यभरातील चार हजारांहून अधिक अधिकारी व कर्मचारी यांची अभियानातील सेवा संपुष्टात आली असून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी आता या अभियानातील ग्रामसंघाच्या महिलांनी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली आहे. गाव पातळीवर या महिलांनी मोर्चा काढल्यानंतर आता राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयावर आज मुकमोर्चा काढत काढण्यात आला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात या मोर्चात हजारो महिला सहभागी झाल्या. ओरोस येथील डॉन बोस्को शाळा ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या 500 मीटरच्या परिसरात महिलांची मोठी रांग लागली होती. यामुळे ओरोस जिल्हा मुख्यालयातील मार्गावर सर्व व्यवहार ठप्प झाले होते. आपल्या अधिकाऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही, अशी भूमिका यावेळी या महिलांनी मांडली. मात्र, यावेळी

हेही वाचा - अरुणा पाटबंधारे प्रकल्प: निविदा क्र.३ नव्याने राबवली जाणार, मंत्री जयंत पाटील यांचे आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.