ETV Bharat / state

ठाकरे सरकाने तौक्तेग्रस्तांना केलेली मदत म्हणजे 'खोदा पहाड और निकला चुहा' - आमदार राणे

author img

By

Published : Jun 5, 2021, 7:02 PM IST

Updated : Jun 5, 2021, 7:34 PM IST

नितेश राणे
नितेश राणे

'खोदा पहाड और निकला चुहा', अशी मदत ठाकरे सरकारने कोकणी माणसांना दिली आहे. इतकी मदत द्यायची होती तर पंचनामे आमची थट्टा करण्यासाठी केली होती का?, निर्लज्जासारखे केंद्राकडून दोन हजार कोटीची मदत मागायची आणि स्वतः केवळ 250 कोटी द्यायचे, अशी टीका आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर केली आहे.

सिंधुदुर्ग - ठाकरे सरकारने कोकणी माणसाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे. चक्रीवादळात कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे अत्यंत तुटपुंजी मदत तौक्ते चक्रीवादळग्रस्तांना हे सरकार देत आहे, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. राज्य सरकारने कोकणात केलेली मदत म्हणजे खोदा पहाड और निकला चुहा, अशी असल्याचेही ते म्हणाले. तर सिंधुदुर्गात पालकमंत्र्यांच्या भाऊ भागीदारीत ऑक्सिजन प्लांट लावून संकटातही पैसे कमावण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला.

बोलताना आमदार राणे

ठाकरे सरकारने कोकणी माणसाला वाऱ्यावर सोडले

निसर्ग चक्रीवादळाप्रमाणे तौक्ते चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईचा अध्यादेश सरकारने जाहीर केला आहे. याबाबत बोलताना आमदार नितेश राणे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. ते यावेळी म्हणाले, जी नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे ती मुख्यमंत्र्यांच्या मुलाच्या खर्चालाही पुरणार नाही. हेक्टरी 50 हजार म्हणजे हापूसच्या झाडाला 500 रुपये, सुपारीच्या झाडाला 250 रुपये, कुणाची टपरी पडली असेल तर 10 हजार रुपये हे जे आकडा आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या मुलाचा खर्चातरी एवढा आहे का, असा प्रश्नही त्यांनी यावेळी केला आहे. जी काही मदत जाहीर केली ते पाहता मग हे पंचनामे आमची थट्टा करण्यासाठी झाले का, म्हणजे एका बाजूला कोट्यधींचे नुकसान झाले आहे. राज्य सरकार केंद्राकडे 2 हजार कोटी रुपये मागयचे आणि स्वतःच्या खिशातून फक्त 250 कोटी रुपये द्यायचे, असाशी ठाकरे सरकार आहे. ज्याने कोकणी माणसाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

पालकमंत्र्यांच्या भावाचा भागीदारीत ऑक्सिजन प्लांट

कोरोनात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी मदत होते तेवढी मदत राज्य सरकार करत नाही. पण, कुडाळमध्ये ऑक्सिजन प्लांट लावला पालकमंत्र्यांच्या भावाच्या भागीदारीतील प्लांट आहे. तो शासकीय प्लांट नाही. म्हणजे त्याच्यात पण पैसे कमावण्याचा प्रयत्न आहे. म्हणजे एका बाजूला लोकांना ऑक्सिजनची गरज आहे, दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचा व्यवसाय करता. ही आश्चर्याची गोष्ट आहे, असेही ते यावेळी म्हणाले. तुम्ही लोकांना मदत करा. लोकांना सहकार्य करा. खिशातून पैसे टाकून मदत करा. येथे ऑक्सिजन प्लांटच्या माध्यमातून तुम्ही व्यवसाय करत असाल आणि मुख्यमंत्रीही त्याचे भागीदार होत असतील तर याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही, असेही आमदार नितेश राणे म्हणाले.

दबाव झुगारून आम्ही पत्रकारांना लसीकरण करू

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संजना सावंत यांच्या आदेशाने जिल्ह्यातील पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करण्यात येत होते. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने हे लसीकरण बंद करण्यात आले. यावर नाराजी व्यक्त करताना आमदार नितेश राणे म्हणाले जे सरकारला जमले नाही ते आमच्या जिल्हा परिषदेने करून दाखवले. मात्र, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर ज्यांचा कुणाचा दबाव असेल तो असुदे तो दबाव झुगारून आम्ही पत्रकारांना लसीकरण करू त्यासाठी आमच्या जिल्हा परिषद अध्यक्ष सक्षम आहेत, असेही ते यावेळी म्हणले.

हेही वाचा - केंद्र सरकार वादळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळतंय - खासदार विनायक राऊत

Last Updated :Jun 5, 2021, 7:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.