ETV Bharat / state

Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात; पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा जागीच ठार

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 5:05 PM IST

Karad Road Accident
भीषण अपघात

Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर पोलीस दलातील पोलिसासह त्याची बहिण आणि भाचा जागीच ठार (Car Accident News) झाले आहेत. अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला आहे. या घटनेमुळे कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावर भीषण अपघातात 3 जण जागीच ठार

सातारा Pune Banglore Highway Accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर कराडनजीक शनिवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात 3 जण जागीच ठार झाले आहेत. महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला वॅगनर कारनं पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात (Car Accident News) झाला आहे. मृतांमध्ये कोल्हापूर पोलीस दलातील एका पोलिसासह त्याची बहिण आणि भाच्याचा (Kolhapur Police Constable Died On Spot) समावेश आहे. अपघातात वॅगनर कारचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी आणि कारमध्ये रक्ताचा सडा पडला होता.



उभ्या ट्रकला कारची पाठीमागून धडक : घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड (ता. कराड) गावच्या हद्दीत बंद पडलेला ट्रक महामार्गाच्या कडेला उभा होता. यावेळी कोल्हापूरकडून पुण्याकडे जाणार्‍या वॅगनर कारनं (क्र. एम. एच. 01 ए. एल. 5458) उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला.



भाऊ-बहिण आणि भाच्याचा मृत्यू : या अपघातात कारमधील दोन पुरूष आणि एक महिला जागीच ठार झाले. नितीन पोवार (रा. कोल्हापूर), मनीषा आप्पासाहेब जाधव, अभिषेक आप्पासाहेब जाधव (दोघेही रा. जरळी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर), अशी मृतांची नावे आहेत. दोघे भाऊ-बहिण होते. भाच्याचे नाव समजू शकले नाही. सर्वजण कोल्हापूरहून पुण्याकडे चालले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मृतांमधील नितीन पोवार हे कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गोपनीय विभागात कार्यरत होते.



अपघातामुळे वाहतूक विस्कळीत : अपघातावेळी मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्राचे कर्मचारी, कराड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेह कारमधून बाहेर काढले. एक मृतदेह अक्षरश: ओढून काढावा लागला. अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी गर्दी हटवून अपघातग्रस्त वाहन बाजूला घेतल्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.



कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा : कराडजवळ अपघातात पोलिसाचा मृत्यू झाल्याची बातमी कोल्हापुरात समजताच कोल्हापूर पोलीस दलावर शोककळा पसरली. पोलीस सहकार्‍यांनी नितीन पोवार यांना समाज माध्यमांवर श्रध्दांजली वाहिली. नितीन पोवार हे कॉन्स्टेबल होते. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात (Juna Rajwada Police Station) गोपनीय विभागात ते कार्यरत होते. त्यांच्या अपघाती निधनाबद्दल पोलीस बांधवांनी शोक व्यक्त केला.

हेही वाचा -

  1. Jalna Accident: मंठा- लोणार रस्त्यावर भीषण अपघात; पीकअपने पाठीमागून धडक दिल्याने कारने घेतला पेट; आगीत महिला ठार
  2. Car Accident in Thane: ट्रकच्या धडकेने कार कोसळली थेट नाल्यात; अग्निशमन विभागाच्या जवानांनी वाचवले कारचालकाचे प्राण
  3. Car Accident Solapur: देवदर्शनाला जाताना भाविकांच्या कारचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.