Car Accident in Thane: ट्रकच्या धडकेने कार कोसळली थेट नाल्यात; अग्निशमन विभागाच्या जवानांनी वाचवले कारचालकाचे प्राण

By

Published : Jun 3, 2023, 8:51 PM IST

thumbnail

ठाणे:  ठाण्यात मुंबई-आग्रा महामार्गवर रुस्तमजी अग्निशमन केंद्राजवळील अर्बानिया सोसायटी समोर कार अपघात झाला. या अपघातामध्ये नाल्यात कार कोसळली. चालक सतिश सदानंद विचारे हे पनवेल वरून ठाण्याकडे येत असतानाच मागून वेगाने येणाऱ्या ट्रकची त्यांच्या कारला धडक बसली. वेगाने बसलेल्या धडकेने कार थेट बाजूला असलेल्या नाल्यात जाऊन कोसळली. कार सोबतच चालक सतीश विचारे कारमध्ये नाल्यात अडकून पडले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चालकाला बाहेर काढण्यात जवान यांना यश आले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने नाल्यात पडलेली कार बाहेर काढली. या अपघातात चालक सतीश विचारे यांना जवानांनी सुखरूप बाहेर काढल्याने त्यांना कसलीही दुखापत झालेली नसून, कारचे मात्र थोडे नुकसान झाले आहे. या नाल्यामध्ये पाण्याचा प्रवाह हा मोठ्या प्रमाणात होता. अग्निशामन दलाने जर वेळीच धाव घेतली नसती तर हा अपघात चालकाच्या जीवावर देखील बेतला असता. वेळीच अग्निशामन दलाने केलेल्या या कामामुळे स्थानिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच या नाल्याच्या संदर्भामध्ये संरक्षक भिंत घालण्याची मागणी देखील केली.

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.