ETV Bharat / state

Ganeshotsav २०२३ : गणेशभक्तांवर वाहतूक कोंडीचं 'विघ्न'; कात्रजसह खंबाटकी घाटात ट्रॅफिक जाम

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 16, 2023, 1:50 PM IST

Traffic Jam at Khambatki Ghat
खंबाटकी घाटात ट्रॅफिक जाम

Ganeshotsav २०२३ : गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त पुण्या-मुंबईहून आपल्या गावी निघाले आहेत. या भाविकांना वाहतूक कोंडीचा मोठा फटका बसला आहे. कात्रज तसंच खंबाटकी घाटात सध्या प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam at Khambatki Ghat) झाली आहे.

सातारा : Ganeshotsav २०२३ : अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची सर्वत्र जोरदार तयारी (Ganesh Festival) सुरू आहे. पुणे-सातारा मार्गावर खंबाटकी घाटात (Khambatki Ghat) वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. वीकेंडला लागून आलेल्या गणेशोत्सवामुळे गणेशभक्त मोठ्या संख्येने पुणे-मुंबईहून गावी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक (Satara News) कूर्मगतीने सुरू आहे.



कात्रज, खंबाटकी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी : पुण्या-मुंबईहून चाकरमानी मोठ्या संख्येने गणेशोत्सवासाठी आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे महामार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. कात्रज घाट, खंबाटकी घाट या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी (Traffic Jam at Khambatki Ghat) झाल्याने पुणे-सातारा मार्गावर दोन्ही बाजूची वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या कात्रज घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळतंय.



वाहतूक कोंडीचं विघ्न : वाहनांची वाढलेली संख्या आणि महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या कामामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे. त्यातच प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याने गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. शुक्रवारी मध्यरात्री पासूनच पुणे-बंगळुरू महामार्गावर वाहतूक मंद गतीने सुरू आहे. अजूनही पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक कोंडी फुटलेली नाही.



वाहतूक कोंडीने वाहनधारक त्रस्त : कात्रज जुना घाट (Katraj Ghat) आणि खंबाटकी बोगदा परिसरात ट्रॅफिक जाम आहे. कासव गतीने वाहने पुढे सरकत आहेत. सातारा-पुणे येण्या- (Pune Satara Highway) जाण्याच्या प्रवासाला तीन तासाहून अधिक वेळ लागत आहे. खंबाटकी घाटात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा -

  1. Ganeshotsav Festival २०२३ : कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, आजपासून मुंबई-गोवा महामार्गावर 'हा' नियम लागू
  2. Mumbai Traffic News : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमानी झाले त्रस्त, वाहतूक कोंडीचे खरे कारण काय?
  3. Thane Traffic Jam: ठाण्यात वाहतूक कोंडी; एकाच वेळी रस्त्यांची कामे सुरु केल्याने वाहतूक कोंडी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.