ETV Bharat / state

Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट पडला महागात; तिघांचा मृत्यू

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 10:01 AM IST

Updated : Sep 28, 2023, 11:12 AM IST

Sangli Ganesh Visarjan
गणेशोत्सव मिरवणुकीत दोघांचा मृत्यू

Sangli Ganesh Visarjan: राज्यात गणेशोत्सवाची धुम सुरु असताना सांगलीत धक्कादायक घटना घडली आहे. गणेश विसर्जनादरम्यान तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन तरुणांचा अचानक मृत्यू (Two Died In Sangli) झाला आहे. यामधील एकाची 10 दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी (Angioplasty Surgery) झाली होती. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सांगली : Sangli Ganesh Visarjan: जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांचा अचानक मृत्यू झाला आहे. तर दोन तरुणांच्या मृत्यूला गणेश विसर्जन मिरवणुकीतील डीजेचा दणदणाट (Djs Noise) कारणीभूत ठरल्याची चर्चा सुरू आहे. तासगाव तालुक्यातील कवठेएकंद मधील शेखर पावशे, वय (32) आणि वाळवा तालुक्यातील दुधारी येथील प्रवीण शिरतोडे, वय (35) असे मृत तरुणांचे (Two Died In Sangli) नावे आहेत.

शेखरची झाली होती अँजिओप्लास्टी : सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका (Ganesh Visarjan) पाहण्यासाठी हे दोघे गेले होते. मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी हा मृत्यु झाला आहे. यापैकी शेखर पावशेची १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. यानंतर सोमवारी रात्री गावातील गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी शेखर गेला होता. यावेळी डीजेचा दणदणाट सुरू असताना शेखरला काही वेळातच अस्वस्थ वाटू लागले. यावेळी शेखर घरी पोहोचल्यानंतर भोवळ येऊन खाली पडल्यावर त्याचा मृत्यू झाला.

डीजेच्या दणदणाटामुळे हा मृत्यू? : प्रवीण शिरतोडे हा गावातील मिरवणूकीमध्ये सामील झाला होता. यावेळी मिरवणुकीमध्ये डॉल्बीचा दणदणात सुरू होता. काही अंतर चालल्यावर प्रवीण शिरतोडे याला देखील अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तो गावातल्या बस स्थानकाजवळच मिरवणुकीतच चक्कर येऊन पडला आणि त्याचा मृत्यू झाला. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीमधील डीजेच्या दणदणाटामुळे हा मृत्यू झाल्याचे बोललं जातं आहे.


मिरवणुकीत आला हृदयविकाराचा झटका : प्रवीण शिरतोडे हे सेंट्रींग व्यवसायिक आहेत. सोमवारी ते कामावरून घरी परतत असताना त्यांची दुचाकी बंद पडली होती. प्रवीण शिरतोडे हे दुचाकी ढकलत घरी पोहोचले होते. त्यानंतर घराजवळ गाडी लावून थोड्या वेळातच गावात निघालेली विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी घरातून बाहेर पडले. आधीच दुचाकी ढकलून प्रवीण शिरतोडे हे दमले होते. अशात त्यांनी डीजेच्या दणदणाटा मध्ये मित्रांसोबत नाचण्यास सुरुवात केली. काही वेळातच त्यांना चक्कर येवून हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व वडील असा परिवार आहे.



डीजेच्या आवाजामुळे जीव जाणार असेल तर राज्य सरकारने तातडीने डीजेवर निर्बंध आणले पाहिजेत. तसेच उच्च न्यायालयाच्या आवाज मर्यादा, नियमांचा उल्लंघन होत असताना पोलीस प्रशासना कारवाई का करत नाही? - सतिश साखळकर ,सामाजिक कार्यकर्ते

उपचारापूर्वी झाला शेखरचा मृत्यू : शेखर सुखदेव पावशे हा चारचाकी दुरुस्तीचा व्यवसाय करतो. शेखर याला हृदयविकाराचा त्रास झाल्याने दहा दिवसांपूर्वीच त्याची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया (Angioplasty Surgery) करण्यात आली होती. सोमवारी शेखर हा गावातील गणेश विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रात्री घरातून बाहेर पडला. गावामध्ये एका मागून एक गणेश विसर्जन मिरवणुका सुरू होत्या. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात डीजेचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीसह शेखर चालत होता. काही अंतर चालून गेल्यानंतर शेखर याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तो घरी परतला आणि घरी येताचं चक्कर येऊन पडला. त्यानंतर शेखर याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वी शेखरचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात्य पत्नी, एक चार वर्षाचा मुलगा, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

डीजेच्या आवाजामुळे तरुणाचा मृत्यू? : अशीच एक घटना पिंपरी चिंचवड येथे घडली आहे. आयटीनगरी हिंजवडीत सर्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटामुळं विघ्न ओढावलं आहे. नियमबाह्य डॉल्बीच्या आवाजानं एका तरुणाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली आहे. नामे योगेश अभिमन्यू साखरे वय वर्ष (23 रा. मारुती मंदिरासमोर) असे मृत मुलाचे नाव आहे. याला मागील सहा महिन्यापूर्वी बीपीचा त्रास होता. यापूर्वी हिंजवडी येथील स्थानिक डॉक्टरांकडे निदानासाठी गेला असता त्याला डॉक्टरांनी सांगितले होते की, तुला हृदयाचा त्रास आहे. लवकर उपचार घेणे गरजेचे आहे.


हेही वाचा -

  1. Mumbai Police Traffic Advisory: मुंबईत गणेश विसर्जनानिमित्त उद्या 'असे' असेल वाहतुकीचे नियमन, काही रस्ते असणार बंद
  2. Ganesh Festival 2023 : राज्यातील विद्यार्थ्यांची सर्वांत मोठी गणेश विसर्जन मिरवणूक, पहा व्हिडिओ
  3. Ganesh Visarjan : विसर्जन नाही आता करा मूर्ती दान... यावर्षी मुंबई महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम
Last Updated :Sep 28, 2023, 11:12 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.