ETV Bharat / state

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

author img

By

Published : Sep 5, 2019, 10:16 PM IST

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ

कृष्णेची पाणी पातळी गुरुवारी सायंकाळी 21 फुटांवर पोहचली आहे. त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यात महापुरामुळे हाहाकार उडवलेल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महापूर ओसरुन अवघे वीस दिवस झालेले असताना, पुन्हा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढत आहे.

सांगली - येथील कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. सांगलीतील नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. कोयना आणि चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. मात्र, ही वाढ नदीपात्रातच राहील. पण तरीही नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ याचा आढावा घेताना प्रतिनिधी

हेही वाचा-राजकारणात प्रवेश केल्यास प्रश्न विचारायचे स्वातंत्र्य गमावून बसेन - नाना पाटेकर

कृष्णेची पाणी पातळी गुरुवारी सायंकाळी 21 फुटांवर पोहचली आहे. त्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. सांगली जिल्ह्यात महापुरामुळे हाहाकार उडवलेल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महापूर ओसरुन अवघे वीस दिवस झालेले असताना, पुन्हा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे ही वाढ सुरू झाली आहे. कोयना धरणातून 86 हजार क्युसेक तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून 16 हजार क्युसेक इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून कृष्णा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहचेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत जरी वाढ होत असली, तरी ही वाढ नदीपात्रामध्ये राहील. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पण सतर्क राहावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


Intro:file name - mh_sng_03_pani_patli_vadh_vis_1_7203751

स्लग - कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ...

अँकर - सांगलीच्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. झपाट्याने या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे,सांगलीतील नदीची पाणीपातळी पोहोचली आहे, कोयना आणि चांदोली धरणातून मोठ्या प्रमाणात सुरू असलेला विसर्ग,त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.मात्र ही वाढ नदीपात्रातच राहील पण तरीही नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.तर कृष्णेचे पाणी पातळी गुरुवारी सायंकाळी 21 फुटांवर पोहचली असून त्या मध्ये झपाट्याने वाढ होत आहे.या वाढत्या पाणी पातळीचा कृष्णा आणि वारणा नद्यांच्या हरिपूर येथील संगमावरून आढावा घेतला आहे,आमचे सांगलीचे ईटीव्ही भारत प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी.


Body:व्ही वो - सांगली जिल्ह्यात महापुरामुळे हाहाकार उडवलेल्या कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महापूर ओसरून अवघे वीस दिवस झालेले असताना, पुन्हा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे,सातारा जिल्ह्यातील कोयना आणि सांगलीच्या शिराळा तालुक्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पाऊस यामुळे धरणातून सोडण्यात येणारया पाण्यामुळे ही वाढ सुरू झाली आहे. कोयना धरणातून 86 हजार क्युसेक्स तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून 16 हजार क्यूसेकस इतक्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.त्यामुळे कृष्णा आणि वारणा दोन्ही नद्यांच्या पाणी पातळी मध्ये वाढ होऊ लागली आहे.बुधवारी जिल्हा प्रशासनाकडून कृष्णा नदीची पाणीपातळी 34 फुटांपर्यंत पोहचेल असा अंदाज वर्तवला आहे,पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आलाय,या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत जरी वाढ होत असली,तरी ही वाढ नदीपात्रामध्ये राहील.त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये,पण सतर्क राहावं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असा आवाहन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी केला आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.