ETV Bharat / state

Gram Panchayat Result: ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी, भाजप दुसऱ्या क्रमांकावर

author img

By

Published : Dec 20, 2022, 9:28 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची बाजी

जिल्ह्यातील 447 पैकी आता पर्यंत 346 ग्रामपंचायत निवडणुकीच्या आलेल्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अव्वल क्रमांकावर आहे,तर भाजपा दुसऱ्या क्रमांकावर आहे. (Gram Panchayat Result) त्या फोटो पाठव आणि चौथ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गट आणि पाचव्या क्रमांकावर उद्धव ठाकरे शिवसेना गट असून या निवडणुकीमध्ये स्थानिक आघाड्यांनी 68 जागांवर यश मिळवले आहे.

सांगली - जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतीसाठी अत्यंत चुरशीने निवडणुका झाल्या, मतदानापूर्वीच 31 ग्रामपंचायत आणि 38 सरपंच बिनविरोध झाले होते.त्यामुळे 416 ग्रामपंचायती आणि 409 सरपंचपदासाठी मतदान झालं होतं, आणि याची मतमोजणी पार पडली आहे, 447 ग्रामपंचायतींचे सर्व निकाल समोर आले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जिल्ह्यामध्ये आघाडीवर आहे. (Gram Panchayat Result) 447 पैकी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटाने जवळपास 154 ग्रामपंचायतवर आपला झेंडा फडकवला आहे.तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप असून तिसऱ्या क्रमांकावर स्थानिक आघाडी असून चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या शिंदे गटाने उल्लेखनीय कामगिरी केली असून ठाकरे गट मात्र शेवटच्या क्रमांकावर फेकला गेलेला आहे.

  • एक नजर टाकूया 447 ग्रामपंचायतच्या गट निहाय बलाबलवर
  • राष्ट्रवादी काँग्रेस गट - 154
  • भाजप गट - 105
  • कॉंग्रेस गट - 61
  • शिवसेना शिंदे गट - 30
  • शिवसेना ठाकरे गट - 03
  • स्थानिक आघाडी - 87
  • घोरपडे गट (कवठेमहांकाळ) - 06
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना - 01

आमदार पडळकर यांच्या गटाची सत्ता - यापैकी लक्षवेधी ठरलेल्या निवडणुका पैकी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे गावाची निवडणूक,ज्या ठिकाणी आंदोलन गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात होत्या,आणि चुरशीच्या निवडणूकीत त्या 300 हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. प्रतिस्पर्धी शिंदे गटाच्या उमेदवार असणाऱ्या कमलाबाई गोरड यांचा त्यांनी पराभव केला आहे.याच बरोबर पडळकरवाडी ग्रामपंचायतवर देखील, आमदार पडळकर यांच्या गटाची सत्ता आली आहे.

रोहित पाटीलांची सरसी - मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायत सुद्धा निवडणूक देखील चर्चेचा विषय ठरली होती,या ठिकाणी यशोधरा राजे शिंदे हे परदेशात शिक्षण घेणारी तरुणी सरपंच पदाच्या निवडणुक रिंगणात उतरले होती.आणि या निवडणुकीमध्ये ती विजयी झाली आहे.त्याचबरोबर यशोधरा शिंदे यांच्या गटाचे पॅनल देखील एकतर्फी विजयी झाले आहे. तर तासगाव-कवठेमंकाळ तालुक्यामध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांचा करिष्मा पहायला मिळाला आहे,54 ग्रामपंचायत आणि सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये 30 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस गटाने सत्ता काबीज केली आहे. तालुक्यात भाजपला 16 ठिकाणी ग्रामपंचायत मध्ये विजय मिळवता आला आहे.तर स्थानिक आघाड्यांना 6 आणि काँग्रेसच्या ताब्यात 2 ग्रामपंचायती गेल्या आहेत,त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा एकदा युवा नेते रोहित पाटील यांच्या गटाने जोरदार धक्का दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.