ETV Bharat / state

सांगलीत घरफोडी करणारी सहा जणांची टोळी जेरबंद,  मुद्देमाल हस्तगत

author img

By

Published : May 29, 2021, 7:18 AM IST

burglary gang arrested in Sangli
सांगलीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद

तासगाव तालुक्यातल्या तुरची फाटा येथील पलुसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही तरुण पैशाची वाटणी करण्यासाठी थांबले आहेत, अशी माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीच्या आधारे कारवाई करून त्यांनी या टोळीली जेरबंद केले.

सांगली - घरफोडी करणाऱ्या एका टोळीला सांगली पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीतील आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी सहा जणांना अटक केली तर दोन जण यावेळी फरार झाले आहेत. त्यांच्याकडून घरफोडीतील एक लाख ७७ हजारांची सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. घरफोडीसाठी एकत्र आले असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने हे कारवाई केली आहे.

सांगलीत घरफोडी करणारी टोळी जेरबंद

दरोडे टाकणारी टोळी जेरबंद -

तासगाव तालुक्यातल्या तुरची फाटा येथील पलुसकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला काही तरुण पैशाची वाटणी करण्यासाठी थांबले आहेत. अशी माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला. यावेळी किरण मलमे (२८), अमोल नाटेकर (२२), अक्षय चव्हाण (२४), सुनील वडर (२३), विजय जाधव (२४), आणि सूरज कोरडे (२२) या सहा जणांना ताब्यात घेण्यात आले. तर मुकुंद झेंडे व विशाल कदम हे दोघे जण पसार झाले. सहा जणांच्याकडे यावेळी सोने, चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल आढळून आला. हा सर्व मुद्देमाल हस्तगत करत सहा जणांना अटक करण्यात आली आहे.

दागिन्यांची वाटणी करताना रंगेहात अटक -

कवठेमहांकाळ तालुक्यातील कुकटोळी याठिकाणी २ वर्षांपूर्वी आणि कुपवाड याठिकाणी सहा महिन्यापूर्वी २ ठिकाणी दरोडे टाकण्यात आले होते. यातील रोकड ही वाटून घेण्यात आली होती. मात्र दागिन्यांची वाटणी झाली नव्हती. ती करण्यासाठी जमलो होतो, अशी कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. तर या टोळीने आणखी काही गुन्हे केलेले आहेत का, याची चौकशी सुरू असल्याचे पोलीस अधीक्षक गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - घरांच्या किमती प्रति चौरस फूट 250 रुपये दराने वाढणार? बिल्डर संघटनेने 'ही' केली मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.