ETV Bharat / state

रिफायनरी समर्थकांची प्रकल्पाची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पोहचवू - खासदार राऊत

author img

By

Published : Aug 22, 2021, 9:55 PM IST

Updated : Sep 10, 2021, 1:41 PM IST

निवेदन देताना
निवेदन देताना

रिफायनरी समर्थकांनी खासदार विनायक राऊत यांची राजापूरमध्ये भेट घेतली. बारसू सोलगावमध्ये रिफायनरी व्हावी, अशी समर्थकांची आग्रहाची मागणी आहे. रिफायनरी समर्थकांची प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंकडे पोहचवू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थक शिष्ट मंडळाला राजापूर येथे दिली आहे.

रत्नागिरी - बारसू, सोलगाव, नाटे दशक्रोशीतील आंबा बागायतदार, मच्छिमार, रिफायनरी समर्थकांनी खासदार विनायक राऊत यांची राजापूरमध्ये भेट घेतली. बारसू सोलगावमध्ये रिफायनरी व्हावी, अशी समर्थकांची आग्रहाची मागणी आहे. रिफायनरी समर्थकांची प्रकल्पाची मागणी जशीच्या तशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पोहचवू, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी रिफायनरी समर्थक शिष्ट मंडळाला राजापूर येथे दिली आहे.

बोलताना खासदार विनायक राऊत

राऊत म्हणाले, रिफायनरी समर्थक व विरोधक दोघांनीही आपली निवेदन दिली आहेत या दोघांचेही म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे ठेवल्या जातील. ज्या बाजूने बहुमत असेल त्या बाजूचा विचार केला जाईल, असे खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. 28 किंवा 29 ऑगस्टला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल, असे खासदार विनायक राऊत यांनी यावेळी सांगितले. यावेळी बारसू सोलगाव भागातील अनेक शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

बारसू, सोलगाव, नाटे दशकोशीतील शेकडो ग्रामस्थांनी राजापुरातील डॉक्टर, वकील, व्यापारी, आंबा बागायतदार, मच्छिमार यांच्या सोबतीने रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांना बारसू सोलगाव परिसरात रिफायनरीच्या उभारणीचे निवेदन रिफायनरी समर्थक समन्वय समितीचे अॅड. शशिकांत सुतार यांनी सर्व उपस्थितांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अग्रेषित असलेले निवेदन खासदार राऊत यांच्याकडे सुपूर्द केले. यावर रिफायनरी समर्थकांच्या भावना व निवेदन जसेच्या तसे मुख्यमंत्र्यांकडे पोहोचविण्याचे आश्वासन खासदार राऊत यांनी समर्थकांना दिले. रिफायनरी समर्थकांच्या मागणीनंतर खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी (दि. 21 ऑगस्ट) रात्री शासकीय विश्रामगृह येथे या रिफायनरी समर्थकांची भेट घेतली.

यावेळी आमदार राजन साळवी, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विलास चाळके, उपजिल्हा पमुख जगदीश राजापकर, तालुका प्रमुख पकाश कुवळेकर आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी अपुरा रोजगार, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, कोविड नंतरची उद्भवलेली परिस्थिती, व्यवसाय वृद्धी, गावातील तरुणांची कमी होत जाणारी संख्या, आंबा बागायतदारांच्या व्यथा, मच्छीमारांच्या समस्या, महिला बचत गटांच्या समस्या व त्यांच्या आर्थिक वृद्धीचे उपाय या व अशा अनेक समस्या खासदारांपुढे मांडल्या. रिफायनरी सारखा प्रकल्प आल्यास त्याचे निराकरण होईल या हेतूने खासदारांकडे हा रिफायनरी प्रकल्प बारसू, सोलगाव, नाटे परिसरात व्हावा ही एकमुखी मागणी केली. बारसू सोलगाव भागात हा प्रकल्प आल्यास एकही घर किंवा मंदिराचे विस्थापनही होत नाही ही बाबही संबंधितांकडून प्रकर्षाने अधोरेखित करण्यात आली.

हेही वाचा - 'एकनाथ शिंदे शिवसेनेचा 'खंबीर खांब', सच्च्या शिवसैनिकाची बदनामी करण्याचे राणेंकडून काम'

Last Updated :Sep 10, 2021, 1:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.