ETV Bharat / state

सात दिवसांच्या टाळेबंदीनंतर आज जिल्हा 'अनलॉक', बाजारात गर्दी

author img

By

Published : Jun 10, 2021, 3:18 PM IST

Updated : Jun 10, 2021, 4:31 PM IST

छायाचित्र
छायाचित्र

सात दिवसांच्या कडक निर्बंधानंतर आज रत्नागिरी जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले. यावेळी नागरिकांनी बाजारात मोठी गर्दी केली होती.

रत्नागिरी - सात दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर आज (दि. 10 जून) जिल्हा अनलॉक झाल्यामुळे बाजारात खरेदीसाठी गर्दी दिसत होती. मागील सात दिवस वैद्यकीय, मेडिकल वगळता इतर सर्व दुकाने, आस्थापना बंद होती. मात्र, आजपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानांसाठी 9 ते 4 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आली आहे.

बाजारातीन गर्दी
कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात 3 जून ते 9 जूनपर्यंत (बुधवार) कडक लाॅकडाऊन केला होता. मात्र, आजपासून हा निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली. सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी राहणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच रत्नागिरीच्या बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी पहायला मिळाली. आज अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू असणार आहेत. पावसाळी सामानापासून ते भाजी खरेदीसाठी लोकांची झुंबड उडालेली पहायला मिळाली.नवीन आदेशानुसार काय सुरू, काय बंद
  • नव्या आदेशानुसार अत्यावश्यक सेवेत अनेक घटक वाढवण्यात आले आहेत .
  • अत्यावश्यक सेवेशी सबंधित सर्व दुकाने व अस्थापना या नव्या आदेशामुळे सकाळी 9 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहणार
  • शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पूर्णवेळ संचारबंदी शिवाय रोज संध्याकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
  • जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केल्यानुसार जिल्ह्यात रुग्णालये, रोग निदान केंद्रे, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषध दुकाने, औषधे निर्मिती उद्योग इतर वैद्यकीय आणि आरोग्य सेवा यामध्ये सहाय्यभूत निर्मिती आणि वितरण युनीटसह विक्रेते, वाहतुकदार व पुरवठा साखळी याचा समावेश असेल. त्याशिवाय लस, सॅनिटायझर, मास्क, वैद्यकीय उपकरणे आणि त्यास पुरक कच्चा माल निर्मिती उद्योग व सहाय्यभुत सेवा यांचाही समावेश असेल.
  • पशुवैद्यकीय सेवा व पाळीव प्राणी काळजी केंद्र व त्यांची खाद्य दुकाने, वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज सुरू राहतील.
  • किराणा सामान दुकाने, भाजीपाला दुकाने, फळविक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई आणि सर्व प्रकारची खाद्य दुकाने सुरू राहणार आहेत.
  • शासकीय विभाग आणि वैयक्तिक करावयाच्या सर्व मान्सून पूर्व कामकाजासाठी आवश्यक साहित्याची दुकाने सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.
  • शितगृहे आणि साठवणूकीची गोदाम सेवा तसेच विविध देशांच्या परराष्ट्र संबंध विषयक कार्यालयांच्या सेवा सुरू राहतील.
  • स्थानिक प्राधिकरणाकडून करण्यात येणाऱ्या सर्व मान्सून पूर्व उपक्रम व कामे आणि स्थानिक प्राधिकरणाद्वारे पुरविण्यात येणाऱ्या सर्व सार्वजनिक सेवा सुरू राहतील.
  • व्यायामशाळा, केशकर्तनालय दुकाने, ब्युटी पार्लर्स, स्पा, वेलनेस सेंटर्स, सार्वजनिक वाहतूक 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया आणि त्यांच्याकडून अत्यावश्यक म्हणून घोषित केलेल्या सेवा, सेबी प्राधिकृत बाजार व कार्यालये, स्टॉक एक्सचेंज व त्यासंबंधित अन्य आस्थापना दुरध्वनी संबंधित सेवाही सुरू करण्याची मुभा असणार आहे. मालाची आणि वस्तुंची वाहतूक, पाणी पुरवठा सेवा पुन्हा सुरू करता येणार आहेत.
  • कृषी विषयक सेवा सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी आवश्यक शाखा यामध्ये शेतीच्या साधनांची उपलब्धता, बियाणे, खते, कृषी अवजारे व त्यांची दुरुस्ती यांचा समावेश राहील. सर्व वस्तूंची आयात-निर्यात, ई कॉमर्स. ( अत्यावश्यक माल आणि सेवा यांचा पुरवठा ) सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे.
  • मान्यताप्राप्त प्रसारमाध्यमे आणि त्यांच्याशी संबंधित सेवा, पेट्रोल पंप व पेट्रोलियम उत्पादने, सर्व कार्गो सेवा, आय टी सेवा ज्या पायाभुत सुविधा आणि सेवा पुरवितात त्या सुरू करता येणार आहेत.
  • सरकारी आणि खासगी सुरक्षा सेवा, विद्युत आणि गॅस पुरवठा सेवा, एटीएम सेवा, टपाल सेवा, बंदरे आणि त्यासंबंधीच्या कृती देखील गुरुवारपासून सुरू करता येणार आहेत.
  • लस-जीवनरक्षक औषधे, औषधी उत्पादनांच्या संबंधी वाहतूक करणारे कस्टम हाऊस एजंट, परवानाधारक मल्टी मोडल ऑपरेटर्स, कोणत्याही अत्यावश्यक सेवांसाठी कच्चा माल पॅकेजींग साहित्य बनविणाऱ्या आस्थापना यांनाही मुभा असणार आहे. आगामी पावसाळ्यासाठी वैयक्तिक वा संस्थात्मक उत्पादनांमध्ये कार्यरत कारखाने, स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलेल्या अत्यावश्यक सेवा सुरू राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

हेही वाचा - बुधवारी कोरोनाचे ५२५ नवे रुग्ण, तर २९ मृत्यूची नोंद

Last Updated :Jun 10, 2021, 4:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.