ETV Bharat / state

350 वर्षांपूर्वीचे चिरेबंद मंदिर आणि भूईकोट किल्ल्याचे स्वरुप...जाणून घ्या पालीच्या बल्लाळेश्वराबद्दल

author img

By

Published : Aug 29, 2020, 2:23 PM IST

ganesh temple in raigad
350 वर्षांपूर्वीचे चिरेबंद मंदिर आणि भूईकोट किल्ल्याचे स्वरुप...जाणून घ्या पालीच्या बल्लाळेश्वराबद्दल

यंदाच्या गणेशोत्सवात अष्टविनायकांचे महत्त्व, अख्यायिका आणि त्यासंबंधी ऐतिहासिक संदर्भ यांबाबत 'ईटीव्ही भारत' वाचकांसाठी विशेष माहिती समोर आणत आहे. रायगडाच्या सुधागड तालुक्यातील पाली गावचा बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. रुंद आणि विस्तीर्ण पृष्ठभागाची बल्लाळेश्वराची मूर्ती, पेशवे चिमाजी आप्पा आणि गणेशभक्त बल्लाळाविषयी जाणून घ्या या 'खास रिपोर्ट'मधून...

रायगड - यंदाच्या गणेशोत्सवात अष्टविनायकांचे महत्त्व, अख्यायिका आणि त्यासंबंधी ऐतिहासिक संदर्भ यांबाबत 'ईटीव्ही भारत' वाचकांसाठी विशेष माहिती समोर आणत आहे. रायगडाच्या सुधागड तालुक्यातील पाली गावचा बल्लाळेश्वर अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे. रुंद आणि विस्तीर्ण पृष्ठभागाची बल्लाळेश्वराची मूर्ती, पेशवे चिमाजी आप्पा आणि गणेशभक्त बल्लाळाविषयी जाणून घ्या या 'खास रिपोर्ट'मधून...

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पाली या स्थानाचा गणेशपुराणात उल्लेख आहे. बल्लाळ नावाच्या एका गणेशक्तावर प्रसन्न होऊन बाप्पा त्याने पुजलेल्या शिळेत येऊन राहिले. त्यानंतर बल्लाळ गणेशाचा उल्लेख बल्लाळेश्वर असा होऊ लागला.

श्री धुंडी गणेशाची कथा

पालीतील गणपतीची एका शिळेत मूर्ती असून बल्लाळेश्वर नावाचा मुलगा त्याची सतत पूजा करत असायचा. त्याच्यामुळे गावातील अन्य मुलेही गजाननाच्या भक्तीला लागली. बाल बल्लाळ ज्या ठिकाणी या धोंड्याची पूजा करत होता. त्यातच श्री गणेशाने येऊन वास केला; आणि पुढे याला बल्लाळ गणेश असे संबोधले जाऊ लागले.

सभा मंडपातील घंटा आणि वसईचा किल्ला

बल्लाळेश्वराचं मंदिर हे वास्तूकलेचा उत्तम नमूना आहे. सूर्योदयाची किरणं थेट मूर्तीवर पडत असल्याची किमया बांधकामातून साकारण्यात आलीय. मंदिर चिरेबंदी असून दगडाच्या चिरांमध्ये शिसं ओतून त्याच्या भिंती मजबूत करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मंदिराचं बांधकाम भूईकोट किल्ल्याप्रमाणे आहे. कळसाच्या तळाशी दगडी आकाराची महिरप आहे. ३५० वर्षांपूर्वी या मंदिराचे बांधकाम झाले आहे. यावेळी मंदिराच्या भिंतींमध्ये वितळलेल्या शिस्यासोबतच चुना आणि गूळाचे मिश्रण घालण्यात आलंय. त्यामुळे भिंतींना आणखी मजबुती मिळाली आहे.

सभामंडपात प्रवेश करताना मोठी घंटा समोर येते. श्रीमंत पेशवे चिमाजी आप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकल्यानंतर ही विजयी घंटा मंदिराला दान केली होती. सभामंडपात प्रवेश करताच मूळच्या लाकडी देवालयाचा जिर्णोद्धार झाल्याचे दिसते. मूळचे पाषाणातील देवालय १७६० साली बांधण्यात आले होते. गाभाऱ्यातील बल्लाळेश्वराची मूर्ती पूर्वाभिमूख असून त्याची सोंड डावीकडे आहे. दगडाच्या सिंहासनावर ही मूर्ती विराजमान आहे.

सभामंडपाबाहेर दोन तलाव आहेत. यातील लहान तलावाला बल्लाळ तिर्थ म्हणतात. मंदिरासाठी लागणारे खडक या तलावातून काढल्याचं सांगितलं जातं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.