ETV Bharat / state

Shivrajyabhishek Din 2023:  शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी तर प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे, मुख्यमंत्र्यांची घोषणा

author img

By

Published : Jun 2, 2023, 7:32 AM IST

Updated : Jun 2, 2023, 11:15 AM IST

इतिहासकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेला राजगड आज पुन्हा भव्य अशा स्वराज्याभिषेक सोहळ्याचा साक्षीदार होणार आहे. रायगडावर आज भव्य असा ३५० वा राज्याभिषेक सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला राज्यभरातील नेते उपस्थित राहिले आहेत.

Shivrajyabhishek Din 2023
३५० वा राज्याभिषेक सोहळा

रायगड : शिवसृष्टीसाठी तातडीने ५० कोटींचा निधी देण्यात येणार आहे. कोस्टल रोडला संभाजी राजे यांचे नाव आणि प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्षपदी उदयनराजे यांची निवड या तीन महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यात केल्या आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस म्हणाले, की शिवरायांनी आरमाराचे व जलसंधारणाचे महत्त्व पटून दिले. स्वराज्य स्थापनेतूनच महाराष्ट्राची निर्मिती झाली आहे. महाराजांमुळेच य़ेत आम्ही आहोत. त्यांनी दिलेल्या मार्गावरून चालत आहोत. पुर्वपुण्याईमुळेच ३५० शिवराज्याभिषेक सोहळा अनुभवत आहे. स्वराजाच्या मार्गाने चालून सुराज्य करणार आहोत. शिवराय न्यायप्रिय राजे म्हणून अजरामर आहेत. शिवरायांनी राज्य कसे चालवावे, हे दाखवून दिल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी म्हटले. महाराजांचे दिल्लीत स्मारक, रायगड परिसरात शिवसृष्टी व प्रतापगड संवर्धन प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा यावेळी फडणवीस यांनी केली.

  • ३५०व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यातून लाईव्ह | किल्ले रायगड https://t.co/2evvMDqs2o

    — Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर भव्य सोहळा पार पडत आहे. तिथीनुसार या सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले असून 1 जून ते 6 जून विविध कार्यक्रम होणार आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे सकाळी रायगडावर दाखल झाले. राज्यभिषेकापूर्वी तुला, मुंज आणि विविध नद्यांचे पाणी आणून जलाभिषेक करण्यात आला आहे. राज ठाकरेंकडून ध्वजपूजन करण्यात आले. शिवरायांच्या जयघोषाने रायगड दुमदुमला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उदयनराजे, मंत्री सुधीर मुनंगटीवार, मंत्री दीपक केसरकर, मंत्री उदय सामंत आदींनी शिवरायांना अभिवादन केले आहे. शिवरायांची आरती करून पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्यात उपस्थितांनी शपथ घेतली आहे. शिवरायांच्या चांदीच्या मुर्तिला दुग्धाभिषेक करण्यात आला आहे.

  • सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम जनतेला ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा.

    ३५० वर्षांपूर्वी महाराजांचा जो राज्याभिषेक सोहळा झाला तो काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःच सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात… pic.twitter.com/p5XEuLi32m

    — Raj Thackeray (@RajThackeray) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला किल्ले रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या ऐतिहासिक क्षणाची सदैव आठवण राहावी, या हेतूने शिवप्रेमींकडून प्रतिवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेचे 350 वे वर्ष सुरू असल्याने हा सोहळा आणखी भव्य करण्यात येणार आहे. यंदा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. यामुळे यंदाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. राज्यभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे.

  • 🚩This is the 350th year of The Coronation ceremony ‘#ShivRajyabhishek’ of Our Greatest King Chhatrapati Shivaji Maharaj.
    And the celebrations have began..
    Do join us as every soldier ‘mavla’ of our Chhatrapati Shivray celebrates it from 1st to 7th June at the Raigad fort and its… pic.twitter.com/0iDuccbJ61

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उपमुख्यमंत्र्यांसह राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छाशिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी रायगडावर लाडक्या राजाच्या सोहळ्यासाठी यावे, असे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे.महापुरुषाचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते. प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी या मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

दिवसभरात असा असेल कार्यक्रम : आज सायंकाळी 5 वाजता 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची' हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा थरारक कार्यक्रम होणार आहे. नागरिकांना महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा सहभाग पहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक युद्धकला कशी होती, हे दिसून येणार आहे. शिवकालीन शस्त्रे पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता राज दरबार येथे 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' हा शाहिरी कार्यक्रम होणार आहे.

22 गाईड व कुटुंबियांना मिळणार विमा संरक्षण: रायगडचा इतिहास अनेक वर्ष हुबेहूब मांडणारे 22गाईड आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारकडून आरोग्य विम्याचे संरक्षण दिले जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना कक्षाच्यावतीने गाईड व त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यात येणार आहे. दरवर्षी सरकारच्यावतीने रायगडावर राज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा केला जातो. यंदाही रायगडावर जल्लोषात उत्सव साजरा केला जात आहे. गेली अनेक वर्षे ऊन, वारा, पाऊस याला तोंड देत किल्ले रायगडावरील येणाऱ्या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांची महती, पराक्रमी इतिहास रोज 22 गाईडस सांगत असतात. त्या सर्वांना विम्याचे संरक्षण कवच देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विम्याच्या संरक्षण कवच पत्र दिले जाणार आहे.


पाच ठिकाणी अखंड पुष्पहार सेवा - रायगडावर १९ फेब्रुवारी २०२१ पासून राजसदर येथील श्री शिवछत्रपतींचा पूर्णाकृती मूर्ती, होळीचा माळ येथील पूर्णाकृती मूर्ती, शिरकाई देवीचे मंदिर, श्री जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी या ठिकाणी दररोज पुष्पहार अर्पण केले जातात. गेली २ वर्षांपासून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या माध्यमातून मुक्ताई गारमेंटतर्फे रायगडावर पाच ठिकाणी अखंड पुष्पहार सेवा हा अभिनव उपक्रम सुरू आहे. यंदा या गाईड लोकांना आरोग्य विमा संरक्षण देऊन गौरविण्यात येणार आहे.


संरक्षण कवच मिळणारे लाभार्थी- रायगड गाईड संघटनेचे पप्पू औकिरकर (अध्यक्ष),अंकेश अवकीरकर, बाळाराम महाबळे, प्रदीप अवकीरकर, सिताराम झोरे, लक्ष्मण अवकीरकर, आकाश हिरवे, रमेश अवकीरकर, सागर काणेकर, चंद्रकांत अवकीरकर, रामचंद्र अवकीरकर, संदीप ढवळे, सखाराम अवकीरकर, संदीप शिंदे, सुनील शिंदे, दिलीप अवकीरकर, निलेश ऑकिरकर, गणेश झोरे, सुनील अवकीरकर, मनेश गोरे, सिताराम अवकीरकर व सुरेश आखाडे अशा एकूण 22 गाईड लोकांचा समावेश आहे. वार्षिक पाच लाख रुपये कव्हर असून यामध्ये सर्व आजारांचा समावेश आहे. यामध्ये गाईडच्या कुटुंबालाही आरोग्य विमा कवच देण्यात आले आहे.

हेही वाचा-

  1. Shivaji Maharaj : शिवराज्याभिषेक दिनासाठी सहस्त्र जल कलश निघाला रायगडाकडे
  2. Shivaji Maharaj Coronation: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिमाखात होणार साजरा, जाणून घ्या काय असणार कार्यक्रम
Last Updated :Jun 2, 2023, 11:15 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.