ETV Bharat / state

Shivaji Maharaj Coronation: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिमाखात होणार साजरा, जाणून घ्या काय असणार कार्यक्रम

author img

By

Published : May 31, 2023, 8:30 AM IST

Updated : May 31, 2023, 10:25 AM IST

यंदा 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळा असणार आहे. यामुळे यंदा मोठ्या दिमाखदार आणि उत्साहात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होणार आहे. संभाजी राजे छत्रपती यांनी यंदाच्या शिवराज्यभिषेक सोहळ्याविषयी माहिती दिली आहे. या कार्यक्रमात कोण-कोणते कला सादर केले जाणार याची माहिती त्यांनी दिली आहे.

छत्रपती संभाजी राजे
छत्रपती संभाजी राजे

छत्रपती संभाजी राजे शिवराज्यभिषेकवर प्रतिक्रिया देताना

पुणे : येत्या 6 जून रोजी किल्ले रायगडावर शिवराज्यभिषेक दिन साजरा केला जाणार आहे. यंदा 350 व्या शिवराज्यभिषेक सोहळा असणार आहे. यामुळे यंदा मोठ्या दिमाखदार आणि उत्साहात शिवराज्यभिषेक सोहळा साजरा होणार आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीतर्फे 5 आणि 6 जून 2023 रोजी हा सोहळा साजरा केला जाणार आहे. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक संभाजी महाराज छत्रपती आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगडावर हा सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा कशाप्रकारे पाडणार, कोण-कोणते कार्यक्रम यावेळी होणार याविषयीची माहिती संभाजी राजे छत्रपती यांनी दिली आहे.

काय असणार वैशिष्ट्ये : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1676 ला 'राज्याभिषेक' झाला होता. या ऐतिहासिक क्षणाची सदैव स्मृती राहावी, या हेतूने प्रतिवर्षी 6 जून रोजी किल्ले रायगडावर भव्य स्वरुपात शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यंदा या ऐतिहासिक घटनेचे 350 वे वर्ष सुरू होत आहे. यंदा 350 वा शिवराज्यभिषेक सोहळा पार पडणार आहे. यामुळे यंदाचा सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यावेळी अनेक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. सोहळ्याचे मुख्य आकर्षण धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची', 'जागर शिवशाहीरांचा..स्वराज्याच्या इतिहासाचा' व 'सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' हे कार्यक्रम असणार आहेत. शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे मार्गदर्शक छत्रपती संभाजी महाराज आणि युवराजकुमार शहाजीराजे छत्रपती यांची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे. देशभरातील शिवप्रेमींनी, शिवभक्तांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

5 जून रोजी असा असेल कार्यक्रम : यंदा गडावर 5 जून रोजी सायंकाळी 5 वाजता 'धार तलवारीची, युद्धकला महाराष्ट्राची' हा शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम होणार. महाराष्ट्रातील युद्धकला आखाड्यांचा यात सहभाग असणार आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक युद्धकला कशी असते. याचे दर्शन गडावर येणाऱ्या तमाम देशवासियांना व्हावे, हा त्यामागचा उद्देश आहे. पट्टा, तलवार, भाला, वीटा, जंबिया, कट्यार, माडू, फरी गलका यांच्या विविध प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता राज दरबार येथे 'जागर शिवशाहीरांचा स्वराज्याच्या इतिहासाचा' हा शाहिरी सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील शाहीर सहभाग घेणार आहेत.

6 जून रोजी असा असेल कार्यक्रम : 6 जूनला मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाणार. सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होणार आहेत. पारंपरिक लोककलांच्या मिरवणुकीत जागर घातला जाणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याचा मार्ग असेल. या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

350 वर्षानंतर रायगडावर निघणार भव्य छबिना मिरवणूक : छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे 350 वे वर्ष आहे. या विशेष सोहळ्याचे औचित्य साधून यंदा शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर राज सदर ते जगदीश्वर मंदिरापर्यंत छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. किल्ले रायगडावर निघणाऱ्या या छबिना मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवरायांच्या काळातील क्षण अनुभवता येणार आहे. छबिना मिरवणुकीमध्ये यंदा चोपदार छत्र, आबदागिरी, मोरचल, अष्टचिन्ह, चवरीसह ऐतिहासिक संदर्भातील साधनासह मावळे सहभागी होणार आहेत. शिवाय महाराष्ट्राची लोककला आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे लोक कलाकार ही सहभागी होणार आहेत.

कोणत्या लोककला पाहायला मिळतील : छबिना मिरवणुकीमध्ये सनई चौघडा, तुतारी, पी ढबाक, ढाल तलवार, भगवे निशान, तोफखाना, जरी पटका, मर्दानी खेळ, तलवारधारी, विटेकरी, भालदार, चोपदार, धन्यूष्यधारी, पट्टेकरी, विविध शस्त्रधारी संत्री, गडावरील मानकऱ्यांसह भारूड, गोंधळी, वासूदेव, पिंगळा, एकतारी सोगी, जागर आदी लोककला सादर केल्या जातील. महाराष्ट्रातील लोककलाकार पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी होतील. याशिवाय 351 ध्वजधारी मावळे बाराबंदी घालून या सभेला मिरवणुकीमध्ये सहभागी होतील.

हेही वाचा-

  1. Chhatrapati Sambhaji Raje समाजाची दिशाभूल करू नये, छत्रपती संभाजी राजेंचा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकाला टोला
  2. Chhatrapati Shahu Maharaj Birthday : छत्रपती शाहू महाराजांचा वाढदिवस! संभाजीराजेंचे वडीलांना भावनिक पत्र
Last Updated : May 31, 2023, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.