ETV Bharat / state

Shiv Jayanti 2023 : प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर? पाहा काय आहे इतिहास

author img

By

Published : Feb 18, 2023, 10:19 AM IST

Updated : Feb 19, 2023, 6:33 AM IST

गड किल्ले म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आलाच, राज्यात जवळपास 400 हून अधिक गड किल्ले असून या गडकिल्ल्यांवर आपल्याला प्रामुख्याने शिवमंदिर हे पाहायला मिळते. एकूणच या सर्व गड किल्ल्यांवर शिवमंदिर का बांधले गेले या मागचा इतिहास काय आहे. हे जाणून घेऊया.

Shivjayanti 2023
शिव मंदिर

प्रत्येक किल्ल्यांवर का असतात शिव मंदिर

पुणे : आपण कोणत्याही किल्ल्यांवर गेलो की प्रामुख्याने आपल्याला किल्ल्यांवर 4 मंदिरे पाहायला मिळतात एक म्हणजे शिव मंदिर, दुसरी म्हणजे देवीच मंदिर, तिसर म्हणजे मारुती मंदिर आणि चौथ म्हणजे गणपती मंदिर हे आपल्याला प्रत्येक किल्ल्यांवर पाहायला मिळतात. ही चार मंदिरे का तर या प्रत्येक देवतांचे एक वैशिष्ट्य आहे. जसे शिव हे मुक्ती देवता आहे तशी देवी ही शक्ती आहे. देवी लढण्याचे सामर्थ देते म्हणून देवीचे मंदिर असते. मारुती हे बलाच प्रतीक आहे आणि गणपती हे बुद्धीची देवता आहे म्हणजेच बुद्धी, बळ, शक्ती आणि मुक्ती असा हा संगम असून आपल्याला प्रत्येक किल्ल्यांवर या चार देवतांची मंदिरे पाहायला मिळतील.



प्रत्येक किल्यावर शिव मंदिर का? शिव का तर शिव हे मुक्ती देवता आहे. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जो युद्धामध्ये कामी येतो म्हणजेच संस्कृतीच रक्षण असेल, राष्ट्राचे रक्षण असेल किंवा समाजावरील आक्रमण असेल आणि त्याच्याशी संघर्ष करत असताना जर ज्या व्यक्तीचे बलिदान होते. तो शिव पदाला जातो. कारण शिव हे मुक्ती देवता आहेत. किल्ल्यांवर युद्धात अनेक व्यक्तीचे निधन होत होते. आपल्याला नेहेमी पाण्याच्या काठावर शिव मंदिर पाहायला मिळतात. का तर ज्या सैनिकांचे निधन झाले त्यांचे दहन तिथे होत होते म्हणून प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक किल्ल्यावर शिव मंदिर पाहायला मिळतात.


अनेक पत्रात शंभू महादेवाच्या नावाने वचन : छत्रपती शिवाजी महाराज हे जेव्हा 15 वर्षाचे होते. तेव्हा त्यांनी प्रथम रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. रायरेश्वरावरील जे प्रख्यात शिव मंदिर होत तिथे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांनी एक प्रतिज्ञा केली की माझ्या आयुष्यातील एक ध्येय आहे. या देशात हिंदवी स्वराज्य स्थापन करायचे आहे. या स्वराज्याच्या मध्यांतून देश, संस्कृती याचे रक्षण होईल. शंभू महाराजांच्या साक्षीने ते अनेक पत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे शपथ घेतात की मी शंभू महादेवाच्या साक्षीने तुम्हाला वचन देतो की असे अनेक पत्र आहे.


भोसले घराण्याचे कुलदैवत शिव मंदिर : एवढेच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील आणि आजोबा एकूणच त्यांच्या घराण्यात देखील आराध्दैवत हे शिंगणापूरच जे शिव मंदिर आहे. ते भोसले घराण्याचे कुलदैवत आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची देखील शंभू महादेवावर फार मोठी श्रद्धा होती. 17व्या शतकात जेव्हा आपल्या सगळ्या किल्ल्यांवर प्राचीन म्हणजेच यादवांच्या काळात मंदिरे होती. पण मुघल आक्रमणामुळे त्या मंदिरांचे विद्वंस झाला आणि अशा वेळेस छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल एका संस्कृतीच दर्शन करत आहोत. आपले प्रेरणास्थान आपल्या पाठीशी देव आहे. अशी समाजात भावना निर्माण व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्व किल्यांवर मंदिरे बांधली.


हेही वाचा : Jyotirlinga In India : भारतातील ज्योतिर्लिंगांना द्यायची आहे का भेट?, मग ही माहिती वाचा

Last Updated :Feb 19, 2023, 6:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.