UPSC Result 2022 : विडी कामगाराच्या पोराने करुन दाखवलं; युपीएससी केली क्रॅक

author img

By

Published : May 23, 2023, 6:16 PM IST

UPSC Result


UPSC Result 2022 : विडी कामगाराच्या पोराने करुन दाखवलं; युपीएससी केली क्रॅक

यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून संगमनेर येथील मंगेश खिलारी याने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मंगेश खिलारीने हे उल्लेखनीय यश मिळवले आहे.

मंगेश खिलारी यूपीएससीत यशस्वी

पुणे : केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC चा निकाल जाहीर झाला आहे. यात इशिता किशोरने 2022 च्या मुख्य परीक्षेत टॉप केले आहे. इशिता किशोरीने ऑल इंडिया रँकमध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. यंदाही नागरी सेवा परीक्षेत महिलांनी अव्वल ३ क्रमांक पटकावले आहेत. टॉपर लिस्टवर नजर टाकली तर, इशिता किशोरने देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. यानंतर गरिमा लोहिया दुसऱ्या तर उमा तिसऱ्या क्रमांकावर आहे.

अवघ्या २३ व्या वयात यूपीएससी पास : व्या यूपीएससीचा निकाल जाहीर झाला असून संगमनेर येथील मंगेश खिलारी याने ३९६ वा क्रमांक पटकावला आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी मंगेशने हे उल्लेखनीय यश मिळवले आहे. मंगेशचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एका छोट्या गावात शेतकरी कुटुंबात झाला. त्याचे वडील चहाची टपरी चालवतात. आई बीडी कामगार असून शेतातही काम करते. UPSC निकाल 2023 संगमनेर येथील मंगेश खिलारी UPSC मधील UPSC महाराष्ट्र टॉपर्समध्ये 396 वा आला आहे.

युपीएससी परिक्षेत 396 क्रमांक पटकावला : त्याचबरोबर स्मृती मिश्रा चौथ्या क्रमांकावर आहे. या परीक्षेत युनिक ऍकॅडमी येथे शिकणारा मंगेश खिलारी याने 396 क्रमांक पटकावला आहे. मंगेश खीलारी हा मूळचा सुकेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगरचा आहे. त्यांच्या वडिलांचे छोटे चहाच दुकान असून आई बिडी वर्कर म्हणुन काम करते. मंगेश 4 वर्षापूर्वी पुण्यात आला होता. त्याने युनिक अकॅडमी येथे अभ्यास करून युपीएसी परिक्षेत 396 क्रमांक पटकावला आहे.

मागच्या वर्षी 3 मार्काने हुकला निकाल : याबाबत मंगेश म्हणाला की ही माझी तिसरी टर्म होती. मागच्या वेळेस फक्त 3 मार्कने मी उत्तीर्ण झालो नव्हतो. पण यंदा मोठ्या प्रमाणावर तयारी केली होती. आज निकाल पाहून खूपच आनंद झाला आहे. मला माझ्या मित्राचा कॉल आला की तू युपीएससीमध्ये पास झाला आहे. हे ऐकून मला विश्वास बसला नाही. मग मी स्वतःच वेबसाईटवर जाऊन निकाल पाहिला. मग गावात आई वडिलांना कॉल करून मी पास झाल्याची माहिती दिली. आज जे काही यश मला मिळाले आहे ते यश माझ्या आई वडिलांचा असून त्यांनीच मला इथवर शिकवले आहे. कारण आमची एवढी शिकायची परिस्थिती नव्हती. त्यांनी जिवाचं रान करून मला शिकवले अशी प्रतिक्रिया मंगेशने दिली आहे.

हेही वाचा -

  1. UPSC Result 2022 Declares : युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर; टॉप पाचमध्ये मुलींचाच नंबर, 'असा' पाहा निकाल
  2. Manohar Joshi Admitted : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल ; उद्धव ठाकरे हिंदूजा रुग्णालयात रवाना
  3. Ajit Pawar On Bjp : वर्षानुवर्षे परंपरा चालु आहे, त्यात जातीय तेढ निर्माण करू नका - अजित पवार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.