ETV Bharat / state

ट्रक चालकांचा संप : पेट्रोल पंप राहणार सुरू, पोलीस संरक्षणात पेट्रोल डिझेलचा करणार पुरवठा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 8:05 AM IST

Updated : Jan 2, 2024, 9:16 AM IST

Ali Daruwala on Petrol Pump : केंद्र सरकारनं हिट अँड रनबाबत नवीन कायदा आणल्यानं ट्रक चालकांनी देशव्यापी संप पुकारला आहे. मात्र या संपाचा पेट्रोल आणि डिझेलवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी स्पष्ट केलं आहे.

Truck Drivers Strike
संपादित छायाचित्र

पुणे Ali Daruwala on Petrol Pump : केंद्र सरकारच्या नवीन कायद्याच्या विरोधात पेट्रोल पुरवठा करणाऱ्या इंडियन ऑइल, एचपीसीएल, बीबीसीएल या तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांनी संप पुकारला आहे. राज्यभरात आजपासून तीन दिवस पेट्रोल पंप बंद राहणार अशी अफवा सर्वत्र पसरली आहे. त्यामुळं सोमवारी रात्री पुणे शहरासह सर्वत्र मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी पंपावर गर्दी केली. मात्र आजपासून पेट्रोल पंप बंद राहणार नाही. सर्व पेट्रोल पंप खुले राहतील, असं स्पष्टीकरण ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलं आहे.

अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन

संपाचा पेट्रोल पुरवठ्यावर परिणाम नाही : याबाबत अली दारूवाला म्हणाले की "आज शहरातील सर्व पेट्रोल पंप खुले राहतील. संपूर्ण भारतातील वाहतूकदारांच्या संपाचा पेट्रोल आणि डिझेलच्या पुरवठ्यावर परिणाम होणार नाही. जिल्हा प्रशासनानं पेट्रोलियम पदार्थांच्या रिफिलिंगसाठी पेट्रोलियम टँकरना पोलीस संरक्षण दिलं आहे. त्यामुळं पेट्रोलचे ट्रक पोलीस संरक्षणात सर्व पंपावर येणार आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सर्व पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत" असंही दारूवाला यांनी यावेळी सांगितलं.

ट्रक चालकांच्या संपानं पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा : केंद्र सरकारनं नवीन कायदा केला असून त्या कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. ट्रक चालकांच्या या संपामुळं व्यापार ठप्प झाला आहे. ट्रक चालकांच्या संपामुळं पेट्रोल पंप बंद राहणार असल्याची अफवा पसरली होती. त्यामुळं पुण्यातील आणि पिपरी चिंचवड परिसरातील पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली होती. पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेनं नागरिकांमध्ये पेट्रोल खरेदीसाठी झुंबड उडाली.

ट्रक चालकांचा संप : केंद्र सरकारनं केलेल्या नवीन कायद्याच्या निषेधार्थ ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. अपघातानंतर जखमी नागरिकांना सोडून पळाल्यास 10 वर्ष शिक्षेची तरतूद या कायद्यात आहे. केंद्र सरकारनं रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी केलेल्या या कायद्याचा ट्रक चालकांना मोठा फटका बसू शकतो, अशी ट्रक चालकांची धारणा झाली आहे. त्यामुळं ट्रक चालक केंद्र सरकारविरोधात संप करत आहेत.

हेही वाचा :

  1. सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुन्या पेन्शन योजनेबाबत सरकार सकारात्मक - मुख्यमंत्री
  2. नवीन मोटार कायद्याच्या विरोधात टँकर, ट्रक चालकांचा संप; इंधनाचा तुटवडा जाणवणार
Last Updated :Jan 2, 2024, 9:16 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.