ETV Bharat / state

बिबवेवाडी, कात्रज परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाची छापेमारी, 5.85 लाखाचा विदेशी मद्यसाठा जप्त

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 29, 2023, 10:34 PM IST

State Excise Dept raids: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांसाठी अवैध मद्य आणून विकले जाते. यावर आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने पथक नेमून कारवाई करण्यात येत आहे. ( Seizure of Illegal Liquor) अशातच काल रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने पुण्यातील बिबवेवाडी आणि कात्रज परिसरात छापेमारी करत दुचाकी वाहनासह गोवा राज्यातील अवैध 5 लाख 85 हजार 850 रुपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

State Excise Dept raids
मद्यसाठा जप्त

जप्त मद्यसाठ्याविषयी माहिती देताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी

पुणे State Excise Dept raids: याबाबत अधिक माहिती अशी की, राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाच्या वतीने बिबवेवाडी गावच्या हद्दीत शिवतेज नगर, अप्पर, बिबवेवाडी या ठिकाणी छापा घातला गेला. (Thirty First Celebration) यावेळी येथे गोवा राज्य निर्मित परंतु महाराष्ट्र राज्यात विक्री आणि बाळगण्याकरिता प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या १८० मिली क्षमतेच्या ९६ सिलबंद बाटल्या आढळून आल्या. यासह एक दुचाकी वाहनही आढळून आले. (Raid on Illegal Liquor) आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपीने त्याच्या घरात मद्यसाठा करून ठेवला असल्याचे सांगितले. त्यानुसार अप्पर, बिबवेवाडी या ठिकाणी छापा घातला असता येथे विविध ब्रॅण्डच्या ७५० मिलीच्या ३६ सिलबंद बाटल्या आणि १८० मिली क्षमतेच्या ४८० सिलबंद बाटल्या (१३ बॉक्स) आढळून आल्या.

जप्त साहित्याचे विवरण: या छाप्यात विदेशी मद्याच्या विविध ब्रॅण्डच्या ७५० मिलीच्या ३०१ सिलबंद बाटल्या (२५ बॉक्सेस) तसेच १८० मिली क्षमतेच्या ३४८ सिलबंद बाटल्या (७ बॉक्सेस) आढळून आल्या. तीनही ठिकाणी छापे घातले असता त्या ठिकाणी अवैध विविध ब्रॅंण्डच्या विदेशी मद्याच्या ७५० मिली क्षमतेच्या ४१७ सिलबंद बाटल्या (३५ बॉक्सेस) आणि १८० मिली क्षमतेच्या ८२८ सिलबंद बाटल्या (एकूण १७ बॉक्सेस) असे एकूण (५३ बॉक्सेस), एक दुचाकी आणि एक आयफोन मोबाईल असा एकूण अंदाजे किंमत ५, लाख ८५ हजार ८५० चा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई ३१ डिसेंबर आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली. अवैध विदेशी मद्य आणि बिअर वाहतुक, विक्री करणाऱ्यां विरुध्द कारवाई करण्यासाठी या विभागाने विशेष भरारी पथके तयार केली आहेत. त्यांच्या मार्फत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी करून कारवाई करण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची जय्यत तयारी: राज्य उत्पादन शुल्क विभागाने थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली असून अवैध पार्ट्या, बनावट मद्याची वाहतूक विक्री करणार्‍यांचा बंदोबस्त करण्यासाठी तब्बल सतरा पथके तैनात केली आहेत. पन्नास अधिकारी आणि सव्वाशे कर्मचार्‍यांच्या भरारी पथकांची जिल्ह्यात करडी नजर असणार आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यात 223 पेक्षा जास्त गुन्ह्यात जवळपास 1 कोटीहून अधिक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी जो एक दिवसाचा परवाना असतो त्यासाठी राज्य उत्पादन शुल्काकडे 20 हून अधिक अर्ज करण्यात आलेले आहे.

हेही वाचा:

  1. जालना ते मुंबई प्रवास आता फक्त सात तासांत पूर्ण, 'वंदे भारत ट्रेन'चं वेळापत्रक घ्या जाणून
  2. 'कायद्याच्या चौकटीत राहून नववर्षाचं स्वागत करा'; 'थर्टी फर्स्ट'साठी मुंबई पोलिसांची फैज तैनात, हुल्लडबाजांना दिला दम
  3. अंबादास दानवे यांच्या व्हॅनिटी व्हॅनचं चंद्रकांत खैरेंच्या हस्ते उद्घाटन, आम्ही वेगळे नसल्याचा सूर
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.