ETV Bharat / state

मोबाईल वापरास मज्जाव केल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

author img

By

Published : Mar 3, 2020, 5:48 PM IST

ऋतिक मानकर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे गावात घडली आहे.

suicide
आई रागावल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

पुणे - मोबाईलचा अतिवापर करत असल्यामुळे आई रागावल्याच्या कारणाने इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका शाळकरी मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ऋतिक मानकर असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबे गावात घडली.

मोबाईल ही सध्या काळाची गरज बनली आहे. मात्र, हाच मोबाईल शाळकरी मुलांच्या मनावर परिणाम करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळकरी मुले अभ्यास सोडून मोबाईलमध्ये व्यग्र राहतात. त्यामुळे मुलांच्या मनावर परिणाम होऊन शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पालक मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, मुले मोबाईलपासून दूर होत नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून ऋतिक मानकर या मुलाने आपला जीव गमावला आहे.

आई रागावल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

ऋतिक शाळेतून घरी आल्यावर अभ्यास न करता तासंतास मोबाईल घेऊन बसायचा. त्यात त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले होते. दरम्यान, मोबाईलच्या वापरावरून आई रागावल्याचा राग मनात धरत ऋतिकने गळफास घेत आत्महत्या केली.

तंत्रज्ञानाच्या युगात मुलांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे पालकांनीही आपल्या मुलांशी चांगला संवाद साधत मुलांवरती अभ्यासाचा दबाव न टाकता समजावून सांगणे गरजेचे असल्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी सांगितले.

हेही वाचा -

सामूहिक अत्याचार अन् खुनाप्रकरणी तिघांना फाशी, अवघ्या चार दिवसातच सुनावली शिक्षा!

महिला दिन विशेष: महिलांचा आवाज लेखणीतून मांडणाऱ्या बीनापानी मोहंतींना 'पद्मश्री'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.