ETV Bharat / state

PM Narendra Modi Speech : लोकमान्य टिळकांकडे दूरदृष्टी...; भाषणात पंतप्रधान मोदींकडून सावरकरांचाही उल्लेख

author img

By

Published : Aug 1, 2023, 4:00 PM IST

Updated : Aug 1, 2023, 7:36 PM IST

महाराष्ट्राच्या भूमीला मी कोटी कोटी वंदन करतो, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (PM Modi) मराठीत आपल्या भाषणाची सुरुवात केली. लोकमान्य टिळक पुरस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. पुण्याच्या पुण्यभूमीत येण्याची मला संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. पुणे ही टिळक, फुले, चाफेकर या वीरांची भूमी आहे. लोकमान्य टिळक (Lokmanya Tilak Award) पुरस्कार स्वीकारताना आनंद होत असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Etv Bharat
Etv Bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण

पुणे - लोकमान्य टिळक यांच्याकडे युवकांकडे बघण्याची दूरदृष्टी होती. टिळकांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना परदेशात शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे हे दोन्ही राष्ट्रपुरुष आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात केले आहे.

पुरस्कार भारतीयांना समप्रित - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत पुणेरी पगडी, सन्मानपत्र आणि भेट देऊन करण्यात आले. मोदींनीही यावेळी मराठीतून जनसागराशी संवाद साधला. मोदी म्हणाले, हा माझ्या जीवनातील अविस्मरणीय अनुभव आहे. एखादा पुरस्कार जेव्हा मिळतो तेव्हा जबाबादारी देखील वाढते. हा पुरस्कार मी 140 कोटी देशवासीयांना समर्पित करतो. ज्यांच्या नावात साक्षात गंगा नदीचे नाव आहे, अशा पुरस्काराची रक्कम मी नमामि गंगा या प्रोजेक्टला देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

मोदी-पवार एकाच मंचावर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज टिळक स्मारक संस्थेकडून लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार प्रमुख उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर दीपक टिळक, रोहित टिळक यांची उपस्थिती होती.

  • पुण्यामध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाल्याने अतिशय सन्मानित झालो आहे. pic.twitter.com/k0jSmr18aW

    — Narendra Modi (@narendramodi) August 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भाषणाची सुरुवात मराठीतून - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीमध्ये केली. प्रथम त्यांनी लोकमान्य टिळकांना अभिवादन केले. मोदी पुढे म्हणाले की, काशी आणि पुणे या भारतातील दोन शहरांशी माझे जवळचे नाते आहे. काशी अमरत्व प्राप्त करून देत तर पुणे विद्या प्राप्त करून देणारे शहर आहे. या दोन्ही शहरांना मोठा इतिहास आहे. लोकमान्य टिळक यांनी स्वदेशीचा नारा दिला होता. आता आमच्या सरकारने गेल्या नऊ वर्षात आत्मनिर्भर भारताचा नारा दिला आहे. त्यातूनच भारतातील लोकांमध्ये सरकारबद्दलचा विश्वास वाढला आहे, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

टिळक आणि सावरकरांची सांगितली आठवण - पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारताना लोकमान्य टिळक आणि गुजरातचासुद्धा संबंध असल्याचे सांगितले आहे. दीड वर्ष लोकमान्य टिळकांनी साबरमती येथे कारावास भोगला. त्यानंतर ते अहमदाबादला आले होते. त्यावेळी 40 हजार लोक त्यांच्या स्वागतासाठी तिथे आले होते. त्यात सरदार वल्लभभाई पटेलसुद्धा होते. त्यानंतर वल्लभभाई पटेल यांनी राणीच्या बागेमध्ये लोकमान्य टिळकांचा पुतळा बसवला आणि त्या पुतळ्याचे लोकार्पण महात्मा गांधींनी केल्याच्या आठवणीसुद्धा यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागवल्या आहेत.

जगात भारताची ओळख - गेल्या नऊ वर्षात भारताची एक वेगळी ओळख विश्वात निर्माण झालेली आहे. जगातली पाच नंबरची सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयाला आलेला आहे. ही प्रगती भारताच्या 140 कोटी लोकांच्या सहभागातून झाली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. जगाला भारताची संस्कृती, परंपरा आणि विद्वत्तेचे दर्शन घडवण्याचं काम आमच्या सरकारकडून चालू आहे. जगात भारताची ओळख निर्माण करण्याचे काम गेल्या नऊ वर्षात सरकार करत असल्याचेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा -

  1. Eknath Shinde Nap : मोदींच्या भाषणावेळी मुख्यमंत्र्यांची ब्रह्मानंदी टाळी?, Video Viral
  2. PM Modi Pune Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'दगडूशेठ' गणपती चरणी लीन; 'हा' केला संकल्प
  3. Tilak Award to Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना शरद पवारांच्या उपस्थितीत लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान
Last Updated :Aug 1, 2023, 7:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.