ETV Bharat / state

Ravindra Dhangekar CM : आमदार रवींद्र धंगेकरांना व्हायचे मुख्यमंत्री, चंद्रकांत पाटलांना दिले मोठे अव्हान

author img

By

Published : Apr 25, 2023, 9:06 PM IST

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar

कसबा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनीही मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या आगोदर देखील राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न व्यक्त केले होते. त्यानंतर आता आमदार रवींद्र धंगेकर यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

रवींद्र धंगेकरांची प्रतिक्रिया

पुणे : आमदार रवींद्र धंगेकर यांनी काल करमाळा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त कली होती. अजित पवार यांच्यानंतर रवींद्र यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या बाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की काल मी करमाळा येथे काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला गेलो होते. त्यावेळी मी मुख्यमंत्री व्हायचे स्वप्न व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री होण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. अजित पावारांनी जी इच्छा व्यक्त केली आहे, ती त्यांची इच्छा आहे. प्रत्येकालाच इच्छा असते माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील इच्छा आहे. मी देखील मुख्यमंत्री व्हावे, पण मला माझी ताकद माहित आहे. इच्छा व्यक्त करण्यात काहीही गैर नाही असे देखील यावेळी धंगेकर म्हणाले.

विधानसभेत आमचे सरकार येणार : राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी टिकणार की नाही अशी चर्चा सुरू आहे. यावर धंगेकर म्हणाले की, आज देशाचे तसेच राज्याचे राजकारण पाहता आज राज्यात महाविकास आघाडी टिकली पाहिजे. पुढील काळात सर्व निवडणुका या महाविकास आघाडीने एकत्र लढावी अशी माझी इच्छा आहे. आम्ही एकत्र लढलो तर, येणाऱ्या महापालिका तसेच विधानसभेत आमचे सरकार येणार असल्याचे विश्वास यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केलं आहे.

चंद्रकांत पाटीलांना खुले अव्हान : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही आमदार धंगेकर यांनी खुले आव्हान दिले आहे. पालकमत्री, चंद्रकांत पाटील हे पुण्याचे आमदार असून त्यांना पुणेकर नागरिकांची काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. तो पाहुणे म्हणून आले आहे. आता पाहुण्यांची जाण्याची वेळ झाली. मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे धंगेकर म्हणाले. तसेत ते तेथून लढतील तेथून माझी त्यांच्या विरोधात निवडणुक लढवण्याची तयारी आहे. त्यांनी माझ्या विरोधात निवकडणुक लढवून दाखवावी असे अव्हान देखील धंगेकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले आहे.


हेही वाचा - Barsu Refinery Project Controversy : बारसू रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्याची सुपारी कुणाकडून? देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना सवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.